CoronavirusUpdates | स्कॉटलंडचा क्रिकेटपटू माजिद हकला करोनाने बाधित

CoronavirusUpdates
CoronavirusUpdates | स्कॉटलंडचा क्रिकेटपटू माजिद हकला करोनाने बाधित
स्कॉटलंडचा क्रिकेटपटू माजिद हकला करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. ३७ वर्षीय माजिद हकने आपल्या ट्विटर हँडलवरुन यासंदर्भातली माहिती दिली. २००६ ते २०१५ या काळात माजिदने ५४ वन-डे आणि २४ टी-२० सामन्यांमध्ये स्कॉटलंडचं प्रतिनिधीत्व केलं आहे. सध्या ग्लास्गोच्या रॉयल अ‍ॅलेक्झांड्रा हॉस्पीटलमध्ये माजिदवर उपचार सुरु आहेत.
आतापर्यंत स्कॉटलंडमध्ये ३२२ लोकांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं असून यामधील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१५ विश्वचषकात माजिद आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. माजिदची तब्येत सध्या स्थिर असली तरीही त्याला पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. माजिद सध्या स्कॉटलंडच्या स्थानिक क्रिकेटमध्ये खेळतो.


No comments

Powered by Blogger.