बॉलीवूड अभिनेत्रींचे महागडे मंगळसूत्र
काळे मणी आणि सोन्याच्या दोन वाटय़ा अशी जरी मंगळसूत्राची रचना असली तरी आता
काळ्या मण्यांसोबत वेगवेगळ्या आकाराचं, खडय़ांचं पेंडंट घालून मंगळसूत्राचं
वेगळं रूप पाहायला मिळतंय. अशातच काही अभिनेत्रीनींही महागडी आणि आकर्षक
मंगळसुत्रे घातली आहे. दीपिकापासून ते ऐश्वर्या रायपर्यंत अनेक विवाहित
बॉलिवूड अभिनेत्रींकडे एवढे महागडे मंगळसूत्र आहेत, ज्याचा तुम्ही कधी
विचारच केला नसेल. चला तर मग पाहुयात बॉलिवूडमधील विवाहित अभिनेत्रींच्या
मंगळसूत्रांच्या किंमती..

विश्वसुंदरी एश्वर्या राय अभिषेक बच्चनसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. २० एप्रिल २००७ मध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नात ऐश्वर्याने घातलेल्या मंगळसूत्राची किंमत तब्बल ४५ लाख रुपये होती. या मंगळसूत्रामध्ये हिरे जडविण्यात आले होते.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ११ डिसेंबर २०१७ रोजी बॉलिवूड
अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत इटलीमध्ये लग्नगाठ बांधली. तेव्हापासून ही
जोडी चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरली आहे
रिपोर्ट्सनुसार, अनुष्का शर्माला विराट कोहलीनं ५२ लाख रूपयांचं मंगळसुत्रं
घातलेय. अभिनेत्री अनुष्का शर्माचं लग्नही बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या
लग्नांपैकी एक होतं. तिनं लग्नात सब्यसाचीची ज्वेलरी परिधान केली होती.
ज्यांच्या डिजाइन सोबतच त्यांच्या किंमतीचीही चर्चा सोशल मीडियावर झाली.

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी २०१८ मध्ये लेक कोमा येथे
डेस्टीनेशन लग्न केलं. या लग्नात दीपिकाने घातलेलं मंगळसूत्राची खूप चर्चा
झाली होती.
काळे आणि सोन्याचे मोती व सिंगल डायमंड वाल्या मंगळसूत्राची किंमत 20 लाख
रुपये सांगितली जात आहे. मुंबईतल्या अंधेरीमधील एका दागिन्यांच्या
दुकानातून तिने हे मंगळसूत्र खरेदी केलं आहे.

काजोल आणि अजय देवगनच्या लग्नाने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
२४ फेब्रुवारी १९९९ रोजी दोघांचा विवाहसोहळा महाराष्ट्रीयन पद्धतीने पार
पडला होता.
लग्नात अजयने काजोलला २१ लाख रुपयांचे मंगळसूत्र घातले होते. लग्नाच्या २० वर्षांनंतरही या दोघांमधलं बॉण्डिंग अप्रतिम आहे.

90च्या दशकात करिश्मा कपूर ही आघाडीची अभिनेत्री होती. काही काळानंतर
तिनेही दिल्लीतील संजय कपूर या व्यावसायिकासह लग्न करत सेटल झाली होती.
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झालाय.
करिश्मा कपूर-संजय कपूरच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. करिश्माच्या
डायमंड स्टडिड मंगळसुत्राची किंमत १७ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.

'धकधक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितने १७ ऑक्टोबर १९९९ मध्ये डॉक्टर श्रीराम माधव नेने यांच्याशी लग्न केले. ९० च्या दशकात सर्वात
जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून माधुरीला ओळखलं जायचं
पोर्ट्सनुसार माधुरीने लग्नात घातलेल्या मंगळसूत्राची किंमत ८ लाख रूपये आहे.

देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली.
जोधपूरमध्ये २०१८ मध्ये १ आणि २ डिसेंबर रोजी प्रियांकाने ख्रिश्चन आणि
हिंदू अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं. राजेशाही थाटात पार पडलेल्या या
सोहळ्यामध्ये प्रियांकाचं मंगळसूत्र हे आकर्षणाचा विषय ठरला.
प्रियांकाने निवडलेल्या मंगळसूत्रात ‘वॉटर ड्रॅप शेप’चं पेण्डंट असून
यामध्ये एक डायमंड बसविण्यात आला आहे. हे पेण्डंट सोन्याच्या चेनमध्ये
गुंफण्यात आलं आहे. विशेष म्हणजे साधं वाटणारं हे मंगळसूत्र कोट्यावधी
रुपयांचं असल्याचं सांगण्यात येत आहे. या मंगळसूत्राच्या किंमतीची माहिती
अद्याप समोर आलेली नाही.

२२ नोव्हेंबर २००२ रोजी अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं उद्योगपती राज कुंद्रा
यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. लग्नात शिल्पाने हटके मंगळसूत्राची निवड केली
होती.
शिल्पानं मंगळसूत्र गळ्यात न घालता ते ब्रेसलेट स्वरुपात होतं. त्यामुळे
शिल्पाने मंगळसूत्र गळ्यात न घालता हातात बांधलं होतं. या मंगळसूत्राची
किंमत ३० लाख रुपये होती.

फॅशनिस्टा’ म्हणून बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करणारी सोनम कपूरने प्रियकर
आनंद आहुजासोबत लग्न केलं आहे. ‘बिग फॅट पंजाबी वेडिंग’ म्हणजे नेमकं काय
असतं याचा प्रत्यय अनेकांनाच सोनमच्या लग्नातून आला.
सोनम आणि आनंदच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या
मेहंदीपासून ते रिसेप्शनपर्यंत प्रत्येक समारंभाच्या चर्चा कलाविश्वात आणि
चाहत्यांच्याही वर्तुळात पाहायला मिळाल्या.
अभिनेत्री सोनमने स्वत: तिचं मंगळसूत्र डिझाइन केलं असून यात आनंद आणि
तिच्या राशीच्या चिन्हाचा समावेश आहे. एक सुरेख असा सोलिटेअरचा हिरा या
मंगळसूत्राला परिपूर्ण करत आहे. रिपोर्ट्सनुसार सोनमच्या मंगळसूत्राची
किंमत ५० हजार रूपये आहे.
(बॉलिवूड अभिनेत्रींच्या मंगळसूत्रांची किंमत इंटरनेटवर उपलब्ध असलेली दिली
आहे. काहींची अधिकृत किंमत माहित नाही.)
Post a Comment