जागतिक क्रमवारीत भारतीय हॉकी संघ चौथ्या स्थानी
![]() |
चक दे इंडिया ! जागतिक क्रमवारीत भारतीय हॉकी संघ चौथ्या स्थानी भारतीय पुरुष हॉकी संघाने जागतिक क्रमवारीत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. हॉकी प्रो-लिग स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीनंतर हॉकी संघ जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर पोहचला आहे. २००३ सालानंतर भारतीय हॉकी संघाची ही सर्वोत्तम झेप मानली जात आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे २०१६ रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाला मागे टाकत भारतीय हॉकी संघाने चौथं स्थान पटकावलं आहे. |
बेल्जियमने या क्रमवारीतल आपलं पहिलं स्थान कायम राखलं असून ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. नेदरलँडच्या संघाने तिसरं स्थान पटकावलं असून भारतीय संघ आता सर्वोत्तम संघांमध्ये गणला जाणार आहे. महिलांच्या क्रमवारीत भारतीय महिलांनी नववं स्थान मिळवलं आहे. १ जानेवारी २०२० पासून आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने जागतिक क्रमवारीत गुण देण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला आहे. जुलै महिन्यात टोकियो शहरात पार पडणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आधी भारतीय संघाने क्रमवारीत घेतलेली ही झेप नक्कीच आश्वासक मानली जात आहे.
Post a Comment