पुलवामा देशाचा भाग नाही का? - बॉलिवूड दिग्दर्शक ओनिर

“गेल्या सहा वर्षात देशात एकही बॉम्ब स्फोट झालेला नाही.” असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं होतं. एका जाहीर कार्यक्रमात केलेल्या या वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान बॉलिवूड दिग्दर्शक ओनिर यांनी पुलवामा हल्ल्याची आठवण करुन देत जावडेकर यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
“पुलवामा देशाचा भाग नाही का?” अशा आशयाचे ट्विट करुन ओनिर यांनी जावडेकर यांच्यांवर टीका केली आहे. गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता.
जैश ए मोहम्मदचा मुदस्सिर हा पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या पार्श्वभूमीवर ओनिर यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी ओनिर यांच्या या ट्विटचा आधार घेत जावडेकरांवर टीका केली आहे.

No comments

Powered by Blogger.