आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील तरुणांची नियुक्ती नाहीच

Image result for maratha arakshn
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा विषय अद्यापही प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयातून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत तरुणांच्या नियुक्तीचा निर्णय घेता येणार नाही, असं महत्त्वपूर्ण विधान बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषदेत केलं आहे. गेल्या 36 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाच्या तरुणांचं आंदोलन सुरु आहे.
भाजप आमदार भाई गिरकर यांनी मराठा आरक्षणासाठी तरुणांनी पुकारलेल्या आंदोलनाचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना हे विधान केलं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, मराठा आंदोलनाचा विषय़ सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून त्या संदर्भात आदेश येत नाही तोपर्यंत तरुणांच्या नियुक्तीचा निर्णय़ घेता येणार नाही. मराठा समाजातील तरुण राज्य शासनाच्या वेगवेगळ्या 56 हून अधिक रिक्त जागांवर नियुक्ती करावी यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला महाराष्ट्र अधिनियम क्र. 62 मधील कलम 18 अन्वये काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून 2014 सालच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांची तत्काळ नियुक्ती करावी यासाठी आंदोलन सुरु आहे. गेल्या 36 दिवसांपासून हे तरुण आझाद मैदानात आंदोलन करीत आहेत.

No comments

Powered by Blogger.