आदित्य ठाकरेंच्या मदतीला धावले रोहित पवार
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर हल्लाबोल करण्याची एकही संधी भाजपा सोडताना दिसत नाही. दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांच्या अनुभवावरुन टीका केली होती. त्यांच्या या टिकेला आदित्य ठाकरेंनी उत्तर न देता आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
“चंद्रकांत पाटील तु्म्ही अनुभवापेक्षा आदित्य ठाकरे यांची कामं बघा. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा जबाबदार विरोधकाची भुमिका तुम्ही पार पाडू शकता,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
“तुमच्या सत्ताकाळात मंत्रिपदाचाही अनुभव नसताना एका व्यक्तीला थेट मुख्यमंत्रीपद मिळाल्याच्या अनुभवावर तर तुम्ही बोलत नाही ना? अशा शब्दांत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता चंद्रकांत पाटलांना सुनावले आहे. त्याचबरोबर “भाजपावर आलेले सध्याचे बुरे दिन हे अहंकाराचा फळं आहे,” अशा शब्दांत त्यांनी आशिष शेलार यांना देखील उत्तर दिलं आहे.
सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड झाल्यानंतर चंद्रकांत पाटील
यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
आदित्य ठाकरेंच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत अनुभव नसताना
उद्धव ठाकरेंनी मुलाला कॅबिनेट मंत्रिपद दिलं असं ते म्हणाले होते.
“राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात ६० तर दुसरे म्हणतात ५० जिंकू. आहेत
त्या ८ टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही
प्राणी थोडं होता येत? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते
निघाले पालिकेच्या मिशनवर. विनोदीच आहे सगळं! पालिकेत अबकी बार भाजपा
सरकार!, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली
होती.
Post a Comment