Corona effect: क्रिकेट मैदानातले असे फोटो तुम्ही कधीच पाहिले नसतील!

मैदानात खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी चाहत्यांची गरज असते. त्यांच्याशिवाय खेळामध्ये जिवंतपणा येत नाही. पण सध्या जगातील अनेक विविध खेळातील सामने हे शांततेत होत आहेत. मैदानात खेळाडू खेळत आहेत पण त्याचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक मात्र उपस्थित नाहीत. करोना व्हायरसच्या धोक्यामुळे अनेक क्रीडा संघटनानी प्रेक्षकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. शांततेतील खेळाचे असे फोटो तुम्ही कधीच पाहिले नसतील.
किरकेटचे  असे फोटो तुम्ही कधीच पाहिले नसतील!
मैदानात एखादा खेळाडू चौकार अथवा षटकार मारतो किंवा एखादा फुटबॉलपटू गोल करतो तेव्हा प्रेक्षक मैदान डोक्यावर घेतात. कोणत्याही खेळाचे मैदान हे प्रेक्षकांच्या उत्साहाने आणि ऊर्जेने भरलेले असते. पण सध्या क्रीडा विश्वात ना प्रेक्षक, ना टाळ्या फक्त खेळाडू सामना खेळत आहेत असे चित्र पाहायला मिळत आहे. याआधी आंतरराष्ट्रीय स्तरावर असे कधीच पाहायला मिळाले नाही जेथे फक्त खेळाडू खेळत आहे आणि मैदानावर एकही प्रेक्षक नाही. याला निमित्त ठरले ते करोना व्हायरस होय. करोनाच्या रुग्णांची वाढ होऊ नये म्हणून जगातील अनेक स्पर्धा या प्रेक्षकांशिवाय होत आहेत. अनेक खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. हा व्हायरस आणखी वाढू नये म्हणून जागतिक आरोग्य संघटना आणि अनेक देशातील तसेच संबंधित खेळाच्या सर्वोच्च संस्था स्पर्धा घेताना विशेष काळजी घेत आहेत.

हा फोटो ऑस्ट्रेलियातील सिडीनी क्रिकेट मैदानाचा आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच मैदानात फलंदाजीसाठी उतरले पण प्रेक्षकच नसल्यामुळे मैदानावर सन्नाटा होता. ना टाळ्या, ना ढोल यांचा आवाज ऐकू येत होता. करोनामुळे सामन्याला एकही प्रेक्षक उपस्थित नव्हता.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात वॉर्नरने ९ चौकारांसह ६७ धावा तर फिंचने ३ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावा केल्या. पण त्यांच्या या धडाकेबाज खेळीचे कौतुक करण्यासाठी प्रेक्षक मात्र नव्हते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. मात्र सामना झाल्यानंतर विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी कोणीच नव्हते. 


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा आणि तिसरा वडने सामना अशाच प्रकारे प्रेक्षकांशिवाय खेळवला जाणार होता. पण बीसीसीआयने करोनाचा धोका लक्षात घेता संपूर्ण मालिकाच रद्द केली. भारतात करोनाचे रुग्ण आढळल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला. दिल्ली सरकारने देखील राज्यातील सर्व स्पर्धा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
युरोपा लीग स्पर्धेत प्रेक्षकांना प्रवेश नसला तरी फक्त खेळाडू आणि अन्य कर्मचारी मैदानात उपस्थित होते. करोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी देखील मास्क घातला होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांचा संबंध सर्वाधिक लोकांशी येतो. म्हणूनच त्यांनी मास्कचा वापर सुरू केला.

No comments

Powered by Blogger.