कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माजलगाव शहरात उपनगराध्यक्षा प्रतिनिधी दिपक मुंडे यांच्यावतीने निर्जंतुकीकरण फवारणी

उपनगराध्यक्षा प्रतिनिधी दिपक मुंडे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊन असल्यामुळे बाजारपेठही कडकडीत बंद आहे. 
हा संसर्गजन्य आजार असल्याने याला पायबंद घालण्याकरिता आज सकाळी माजलगाव शहरा मधील समता कॉलनी दत्त मंदिर परिसर बँक कॉलनी श्रीकृष्ण नगर विवेकानंद नगर निर्जंतुकीकरण करन्यासाठी ट्रॅक्टरद्वारे  फवारणी करण्यात आली. 
शहरातही अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसतानाही खबरदारी म्हणून उपनगराध्यक्षा प्रतिनिधी दिपक मुंडे, नगरसेवक शरद यादव आणि न. प. कर्मचारी यांच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे.

No comments

Powered by Blogger.