stock news शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स १५०० अंकांनी कोसळला
Stock news, Stock, Stocks, Indian stock शेअर बाजारावर आजही करोनाचा परिणाम पहायला मिळाला. आठवड्याच्या पहिल्याच
दिवशी बाजार खुला झाला तो मोठ्या पडझडीनच. बाजाराला सुरुवात होण्यापूर्वी
सेन्सेक्स १५९१.८० अंकांनी कोसळून ३२,५११.६८ अंकांवर उघडला. तर निफ्टी
४४६.८५ अंकांनी कोसळत ९५०८.३५ अंकांवर उघडला.
शुक्रवारी सकाळी लोअर सर्किटमुळे बाजाराला सुरुवात होताच ट्रेडिंग
थांबवावे लागले होते. त्यानंतर ४५ मिनिटांच्या अडथळ्यानंतर बाजार पुन्हा
सुरु झाला आणि पुढे याची स्थिती सुधारत गेली. दिवसभराच्या चढ-उतारानंतर
सेन्सेक्स १,३२५.३४ अंकांनी वाढून ३४,१०३.४८ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी
४३.५० अंकांनी वाढत १०,०२३.६५ वर बंद झाला होता.
रुपयाचे मुल्यही घसरले
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाचे मूल्यही १५ पैशांनी घसरल्याचे पहायला
मिळाले. यानंतर सध्या रुपयाची किंमत ७४.०६ रुपयांवर स्थिरावली आहे.
दरम्यान, शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ७३,९१ रुपयांवर होते.
जागतिक अर्थव्यस्थेवर करोनाचे सावट
करोना विषाणूमुळे जागतिक अर्थव्यस्थेला वाचवण्यासाठी जगभरातील केंद्रीय
बँका पुढे येत आहेत. युएस फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दरांमध्ये कपात केली
आहे. तसेच न्यूझीलंडच्या केंद्रीय बँकेने देखील आपत्कालिन बैठकीनंतर व्याज
दरांमध्ये कपात केली आहे. यापूर्वी संयुक्त अरब अमिरातीच्या केंद्रीय
बँकेने २७ अब्ज डॉलर पॅकेजची घोषणा केली होती. याद्वारे यूएईतील बँकांना
मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर सौदी अरेबियाने देखील १३ अब्ज डॉलर पॅकेजची
घोषणा केली होती. याचा देखील शेअर बाजारावर प्रभाव पडत आहे.
Stock news, Stock, Stocks, Indian stock संबंधित बातम्या पाहा
Post a Comment