#Maharashtra: उद्धव ठाकरे अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री-चंद्रकांत पाटील

Maharashtra politics, Maharashtra,Chandrakant Patil
Maharashtra politics, Chandrakant Patil, Maharashtra : 
 उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले. या सरकारच्या काळात झालेल्या कामाचं मूल्यमापन करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ‘उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी जन्माला आलेले नाही. ते नेता म्हणूनही जन्माला आलेले नाहीत. ते वारसा चालवत आहेत. उद्धव ठाकरे हे अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले. शंभर दिवसांच्या कामाविषयी आणि राज्यासह देशातील राजकीय घडामोडींविषयी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’ला मुलाखत दिली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारसह आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर टीकेचे बाण सोडले.

Maharashtra politics, Chandrakant Patil, Maharashtra :संबंधित बातम्या पाहा 

No comments

Powered by Blogger.