WhatsApp वर ‘डार्क मोड’ची एंट्री

Image result for whatsapp-dark-mode
WhatsApp युजर्ससाठी गुड न्यूज आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कंपनीने अँड्रॉइड आणि iOS च्या सर्व युजर्ससाठी ‘डार्क मोड’ फीचर रोलआउट केलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या फीचरची कंपनीकडून चाचणी सुरू होती. डार्क मोडमुळे चॅटिंग करताना युजर्सच्या डोळ्याला मोबाइल स्क्रीनमुळे होणारा त्रास कमी होणार आहे. याशिवाय फोनच्या स्क्रीनमधून येणाऱ्या लाइटचाही कमी वापर होणार असल्याने फोनची बॅटरी अधिक काळ टिकेल.
“केवळ व्हाइट आणि ब्लॅक कलरच्या कॉम्बिनेशनमुळे युजर्सच्या डोळ्यांवर ताण यायचा, असं निरीक्षण आम्ही चाचणीवेळी नोंदवलं. त्यामुळे आता WhatsApp मध्ये खास डार्क ग्रे बॅकग्राउंड आणि ऑफ व्हाइट कलर पाहायला मिळेल. यामुळे स्क्रीन ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्टमध्येही सुधारणा झाली आहे. डार्क मोडमध्ये आधीपेक्षा नक्कीच चांगल्या चॅटिंगचा अनुभव मिळेल”, असं कंपनीकडून सांगण्यात आलं.
युजर डार्क मोड फीचर त्यांना पाहिजे तेव्हा ऑन किंवा ऑफ करु शकतात. डार्क मोडमध्ये ब्लॅक बॅकग्राउंडवर डार्क ग्रे टेक्स्ट दिसतील. पहिले बॅकग्राउंड व्हाइट आणि टेक्स्ट गडद असायचे. व्हाइट बॅकग्राउंडमुळे रात्रीच्या वेळी अंधारात चॅटिंग करताना युजर्सना त्रास व्हायचा, कारण यातून जास्त प्रकाश डोळ्यावर पडायचा. पण डार्क मोड फीचरमध्ये प्रकाश खूप कमी प्रमाणात वापरला जातो. डार्क मोडमुळे फोनची स्क्रीन पिक्सलचा कमी वापर करते, त्यामुले बॅटरीवरही जास्त दबाव पडत नाही.
असं करा अ‍ॅक्टिवेट-
अँड्रॉइड 10 आणि iOS 13 युजर्स डार्क मोड फीचर डायरेक्ट सिस्टिम सेटिंग्समध्ये जाऊन सुरू किंवा बंद करु शकतात. तर, अँड्रॉइड 9 आणि त्यापेक्षा जुन्या ओएस युजर्सना WhatsApp Settings > Chats > Theme > select ‘Dark’ या पद्धतीने डार्क मोड फीचर वापरता येईल. डार्क मोडसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्याकडील WhatsApp लेटेस्ट व्हर्जनचे असावे, जर नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाऊन WhatsApp अपडेट करु शकतात.

No comments

Powered by Blogger.