आजचे राशीभविष्य
वृषभ : रोखठोक भूमिका नको. चर्चा करा. वाद वा घुसमट टाळा.
मिथुन : तर्कावरचे गणित चुकणे शक्य. अगोचर वृत्ती अंगाशी येईल. काही जुगारी निर्णय यश देतील.
सिंह : चेष्टा अंगाशी येणे शक्य. वेळ पाळता न आल्यास नुकसान होण्याची शक्यता. परमार्थ करा.
कन्या : अति संशोधनाचा हव्यास नको. जमेल, झेपेल तेवढेच काम करा. शब्द देणे नको.
तुळ : सतत बदल करणे नको. घडी विस्कटेल असे वर्तन टाळा. अपप्रचार नको.
वृश्चिक : कायदा हातात घेऊ नका. धाडसी निर्णय अंगाशी येतील. नियमांची अंमलबजावी करणे हिताचे.
धनु : आपसुक प्रेमात पडाल. मने जुळतील. भावबंध गहिरे होतील.
मकर : हातचे सोडून पळत्यापाठी जाणे नको. पालकत्व घ्यावे लागेल. संधी घ्या.
कुंभ : अविश्वास दाखवू नका. हर्षातिरेकाने शब्द देणे नको. साहसे त्रास देतील.
मीन : वात्सल्याने कामे होतील. भांडणे वा वाद नको. काटेकोरपणा सोडा.
Post a Comment