आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कौतुक यांचे केलं पाहिजे - अभिनेता रितेश देखमुख
![]() |
आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कौतुक यांचे केलं पाहिजे - अभिनेता रितेश देखमुख |
आधी करोनाचा शिरकाव आणि त्यामागून आलेल्या लॉकडाउनमुळे लोकांमध्ये
काहीसं चिंतेच वातावरण आहे. २१ दिवसांचा लॉकडाउन ३ मे पर्यंत लांबला.
त्यामुळे करोना कधी थांबणार आणि जनजीवन पुन्हा कधी सुरळीत होणार याकडे
सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कमी करण्यासाठी जनतेच्या मनातील भीती कमी
व्हावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधून धीरही देत आहेत. त्यांच्या या
गोष्टीचं सगळीकडून कौतुक होत असून, अभिनेता रितेश देशमुखही
मुख्यमंत्र्यांच्या कृतीनं भारावून गेला आहे.
राज्यात करोनाचा प्रसार झाल्यानंतर राज्य सरकारनं अनेक पावलं उचलली.
विशेषतः लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आल्यानंतर अफवांमुळे लोकांमध्ये भीतीचं
वातावरण तयार होत होतं. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या
निर्णयावरूनही लोकांचा गोंधळ उडत होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सुरूवातीपासुन जनतेच्या मनातील संभ्रम संवादाच्या माध्यमातून दूर करत आहेत.
एकूण परिस्थिती हाताळण्याविषयी त्यांचं कौतुक होत असून, अभिनेता रितेश
देशमुखनंही याविषयी एक ट्विट केलं आहे.
“आपण सगळेजण एका अभूतपूर्व संकटाला तोंड देत आहोत. करोना विषाणूबरोबरच आपण
भीती, चिंता आणि अनिश्चिततेविरुद्ध देखील लढा देत आहोत. अशा काळात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत स्पष्टपणे आणि जिव्हाळ्यानं आपल्याशी
नियमिपणे संवाद साधत आहेत. त्यांचं यासाठी आपण कौतुक केलं पाहिजे,” असं
आवाहन अभिनेता रितेश देखमुख यांन ट्विट करून केलं आहे.
राज्यातील लॉकडाउन वाढवण्यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यानंतर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला
होता. त्याचबरोबर राज्य पोलीस दलातील दोन पोलिसांचा करोनामुळे मृत्यू
झाल्याचं सांगत त्यांनी हळहळ व्यक्त केली होती.
Post a Comment