जगभरात कोरोनामुळं बळींची संख्या 2 लाखांवर तर कोरोनाबाधितांचा आकडा 29 लाख 20 हजारांवर
![]() |
जगभरात कोरोनामुळं बळींची संख्या 2 लाखांवर तर कोरोनाबाधितांचा आकडा 29 लाख 20 हजारांवर |
जगभरात कोरोना व्हायरसमुळे
मृत्यू झालेल्यांची संख्या 2 लाखांच्या वर पोहोचली आहे. जीवघेण्या कोरोना
व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 2 लाख 3 हजार 269 लोकांचा मृत्यू झाला आहे.
तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 29 लाख 20 हजारांवर
पोहोचली आहे. जगभरात 8 लाख 36 हजार रुग्ण बरे झाले आहेत. वर्ल्डोमीटरच्या
आकडेवारीनुसार मागील 24 तासात 90,731 नवीन कोरोनाबाधित जगभरात सापडले आहेत.
तर मागील 24 तासात जगात 6,069 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.
जगभरातील 210 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. सध्या 1,823,074 लोकं
माइल्ड तर 57864 लोक कोरोनामुळं सिरीयस तसेच क्रिटिकल कंडिशनमध्ये आहेत.
जगातील अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस,
ब्रिटन हे पाच देश असे आहेत जिथं कोरोनामुळे 20 हजाराहून अधिक बळी गेले
आहेत. एकट्या अमेरिकेत कोरोनाचे 50 हजारांहून अधिक बळी गेले आहेत.
ब्रिटनमध्ये कोरोनामुळे
मृत्यूची संख्या 20 हजारांवर गेली आहे. मागील 24 तासांमध्ये 4,913 नवीन
कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 813 लोकांचा मृत्यू इथं झाला आहे. हुई
है. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 1 लाख 48 हजार 377 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला
आहे.
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 960651 लोकांना
कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 54 हजार लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय.
अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोविड-19मुळं 22,902 लोकांचा मृत्यू झालाय. 223,759
लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या
आकड्यात इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 26,384 मृत्यू झाले
आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 195,351 इतका आहे.
-
- फ्रांस: कोरोनाबाधित- 161,488, मृत्यू- 22,614
- जर्मनी: कोरोनाबाधित- 156,513, मृत्यू- 5,877
- यूके: कोरोनाबाधित- 148,377, मृत्यू- 20,319
- टर्की: कोरोनाबाधित- 107,773, मृत्यू- 2,706
- इरान: कोरोनाबाधित- 89,328, मृत्यू- 5,650
- चीन: कोरोनाबाधित- 82,816, मृत्यू- 4,632
- रशिया: कोरोनाबाधित- 74,588, मृत्यू- 681
- ब्राझिल: कोरोनाबाधित- 59,196, मृत्यू- 4,045
- कॅनडा: कोरोनाबाधित- 45,354, मृत्यू - 2,465
Post a Comment