बँका, एटीएम सुरू राहणार का?
![]() |
बँका, एटीएम सुरू राहणार का? |
लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने
मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. त्यात कुठले उद्योग, व्यवसाय सुरु राहतील
ते स्पष्ट केले आहे. करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाउन तीन मे
पर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केली.
२० एप्रिलपासून मर्यादीत स्वरुपात काही उद्येगांना काम सुरु करण्यासाठी
परवानगी देण्यात येणार आहे. पण त्यासाठी काही अटी असून त्याचे सक्तीने पालन
करावे लागेल. बँकांच्या शाखा, एटीएम, बँकांचे संचालन सुरळीत ठेवण्यासाठी
काम करणारा आयटी विभाग आणि रोख रक्कमेचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था यांचे
काम सुरु राहील. बँकांचे सर्व व्यवहार सुरळीत सुरु राहणार असून एटीएममध्ये
नेहमीप्रमाणे कॅश भरली जाईल.
लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यातही बँका, एटीएमशी संबंधित सर्व कामे सुरळीत
सुरु होती. सोशल डिस्टन्सिंग आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी बँकांच्या
शाखांमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची
असेल. आरोग्य सेवा, शेती आणि मनरेगाशी संबंधित कामांनाही सरकारने सवलत
दिली आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन झालेच पाहिजे हे सरकारने
स्पष्ट केले आहे.
Post a Comment