पुण्यापाठोपाठ सोलापूर शहर सील
![]() |
पुण्यापाठोपाठ सोलापूर शहर सील |
कोरोना व्हायरसचं वाढतं प्रमाण पाहता
सोलापूर जिल्ह्यात तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात येणार असून सर्व हद्दी
बंद केल्या जाणार आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हे
आदेश दिले आहेत. सोलापूरमध्ये 20 एप्रिल 2020 रोजी दुपारी 2 पासून 23
एप्रिल रात्री 12 पर्यंत संपूर्ण संचार बंदी असेल. याकाळात जीवनावश्यक
सेवा, मेडिकल आणि दूध वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहे. किराणा, भाजी, फळं
काहीही सुरु राहणार नाही. आदेश आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर
कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
"सोलापूर शहरामध्ये कोरोना व्हायरसची लागण
होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार
रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सोलापूर शहरामध्ये संपूर्ण संचारबंदी लागू
करुन शहराच्या सर्व हद्दी बंद करणं आवश्यक आहे. त्यामुळे 20 एप्रिल 2020
दुपारी 2 पासून 23 एप्रिल 2020 रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी
लागू करुन शहरातील सर्व दुकानं आणि शहराच्या सर्व हद्दी बंद करण्यात येत
आहे," असं जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकात म्हटलं आहे.
1. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरवणारी
खाजगी/ सरकारी रुग्णालये, दवाखाने, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर आणि वैद्यकीय
सेवेशी संबंधित कर्मचारी आणि त्यांची वाहने, तसेच SARI, ILI आणि Contact
Tracing या आजारासंदर्भात सर्व्हेक्षण करणारे अधिकारी/ कर्मचारी.
2. ॲम्बुलन्स सेवा.
3. रुग्णालयामध्ये आणि दवाखान्याशी संलग्न असणारी औषधांची दुकाने तसेच इतर औषधांची दुकाने त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील.
4. कायदेशीर कर्तव्य बजावत असणारे अधिकारी
आणि कर्मचारी, उदा. पाणीपुरवठा, अग्निशमक, विद्युत पुरवठा, पोलीस
विभागातील कार्यरत अधिकारी/कर्मचारी
5. सकाळी 6.00 ते 9.00 या कालावधीत दूध वाटप आणि विक्री करता येईल.
६. शहरातील पेट्रोल पंप सकाळी 7.00 ते
11.00 या कालावधीत सुरु राहतील. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतील
शासकीय वाहने, ॲम्बुलन्स, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर आणि कर्मचारी यांची
वाहने तसेच पोलीस विभागाच्या वाहनांना पेट्रोल/डिझेल देण्यात येईल.
काही ठिकाणी भाजी, किराणा खरेदीसाठी गर्दी
शहरात दुपारी दोन वाजल्यापासून संचारबंदी लागू होणार असल्याने सोलापूरकरांनी सकाळपासूनच खरेदीसाठी काही ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं समोर आलं आहे. पुढील तीन दिवस संचारबंदी असल्याने भाजी, किराणा इत्यादी वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. मात्र कोणत्याही प्रकारची गर्दी कुठेही करु नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
शहरात दुपारी दोन वाजल्यापासून संचारबंदी लागू होणार असल्याने सोलापूरकरांनी सकाळपासूनच खरेदीसाठी काही ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं समोर आलं आहे. पुढील तीन दिवस संचारबंदी असल्याने भाजी, किराणा इत्यादी वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. मात्र कोणत्याही प्रकारची गर्दी कुठेही करु नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
Post a Comment