धारावीत सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण

धारावीत सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण
धारावीत करोनाच्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आधीच आरोग्य विभागाची चिंता वाढली असताना आता अजून एक रुग्ण सापडला आहे. धारावीत एका सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. वरळी कोळीवाडय़ापाठोपाठ दाटीवाटीच्या धारावी परिसरात करोनाने शिरकाव केला असल्याने धोका निर्माण झाला असून आरोग्य यंत्रणांसमोर मोठं आव्हान आहे.
धारावीत करोनाच्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आधीच आरोग्य विभागाची चिंता वाढली असताना आता अजून एक रुग्ण सापडला आहे. धारावीत एका सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. महापालिकेच्या ५२ वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. हा सफाई कर्मचारी वरळीचा रहिवासी आहे. धारावीत त्याला तैनात करण्यात आलं होतं. करोनाची लक्षणं आढळल्याने अधिकाऱ्यांना त्याला वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितलं होतं. यावेळी त्याला करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं. वरळी कोळीवाडय़ापाठोपाठ दाटीवाटीच्या धारावी परिसरात करोनाने शिरकाव केला असल्याने धोका निर्माण झाला असून आरोग्य यंत्रणांसमोर मोठं आव्हान आहे.  सध्या या सफाई कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. या सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंब आणि सहकाऱ्यांना क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे.
धारावीत करोनाबाधिताचा मृत्यू –
धारावीमधील करोना रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला. मुंबई महापालिकेने धारावीतील बालिका नगर परिसरात राहणाऱ्या ५६ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. उपचारासाठी त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता या रुग्णाचा मृत्यू झाला. धारावीतील या रुग्णाला २३ मार्चपासून ताप येत होता. २६ मार्च रोजी त्याने खासगी दवाखान्यात उपचार घेतले. मात्र, काहीच फरक न पडल्याने २९ मार्च रोजी त्याला लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला करोना झाल्याचे बुधवारी स्पष्ट झालं होतं. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता या रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाच्या संपर्कात आलेले रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
रुग्ण राहात असलेल्या परिसरातील आठ इमारतींमधील ३०८ सदनिकांमधील नागरिकांना घऱाच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तर वरळी कोळीवाडा येथील ८६ नागरिकांना पोद्दार रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.

No comments

Powered by Blogger.