आजचे राशीभविष्य

मेष : अलिप्त स्वभावामुळे लाभ. मध्यस्थाची भूमिका नको. वैचारिक गुंतागुंत टाळावी.
वृषभ : वाढीव जबाबदारीने त्रस्तता येईल. महत्त्वाची कामे रखडतील. निराशा वाढेल.

मिथुन : असत्य बोलणे घात करेल. विरोध करू नका. आज गांधीगिरीने प्रियव्यक्तीचे मन जिंकाल. 


सिंह : खात्री देता येणे शक्य नसेल, तर घाई नकोच. सावध पवित्रा हवा. पोटाचे विकार त्रस्त करतील.

कन्या : गरज समजून काम करायला हवे. घाई केल्यास तोटा. मन कलुषित होऊ देऊ नका.

तुळ : विनाकारण तोंडसुख नको. बोचरी टीका होईल. भावनिक विचार वा ताण नको.

वृश्चिक : पदार्थ बिघडणे शक्य. नादात राहू नका. भक्तीमय दिवस.

धनु : घरातील वातावरण नरम गरम राहील. कष्ट वाढतील. शब्दांचे युद्ध रंगेल.

मकर : खर्चाचे प्रमाण आटोक्यात राहील. जोडीदार प्रसन्न राहील. आकांक्षा पूर्ण होतील.

कुंभ : वादळी चर्चांतून क्षोभ. युक्तीने प्रश्न सोडवा. रिकामा वेळ सत्कारणी लावा.

मीन : अफवांवर विश्वास ठेवू नका. मनाने कणखर बना. शारीरिक व्याधीकडे दुर्लक्ष करू नका.

No comments

Powered by Blogger.