केशरी रेशन कार्डधारकांनाही मिळणार लाभ?

केशरी रेशन कार्डधारकांनाही मिळणार लाभ?
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सध्या देश लॉकडाउन आहे. करोनाचा महाराष्ट्रालाही फटका बसला आहे. या संकटामुळे लॉकडाऊन झालेल्या जनतेला राज्यातील महाविकास आघाडी सरकार दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडी सरकारने हातावर पोट असलेल्या आणि गरीब गरजुंसाठी अन्नधान्याच्या विविध योजना हाती घेतल्या आहेत. मात्र केशरी रेशन कार्डधारकांचाही राज्य सरकारने योग्य तो विचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. या संबधी आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या काळात गरीब नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. तशातच केशरी रेशन कार्डधारक आणि गरीब व गरजुंना अन्नधान्याचा तुटवडा भासू नये यासाठी त्यांच्याही योग्य तो विचार राज्य सरकारने करायला हवा, अशी मागणी शरद पवार यांनी केली होती. त्यानंतर करोनाच्या पार्श्वभूमीवर केशरी रेशनकार्डधारकांना रेशनचे धान्य मिळण्याबाबत, तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाने गरीब व गरजुंसाठी काय उपाययोजना केल्या आहेत, याबाबत माहिती देण्याच्या उद्देशाने भुजबळ यांनी मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. लॉकडाउन परिस्थितीत केशरी रेशन कार्डधारक तसेच समाजातील गरीब घटकांना योग्य अन्न-धान्य पुरवठा करण्यासंबंधी महाराष्ट्र सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत, याबाबत भुजबळ यांनी शरद पवार यांना माहिती दिली.

No comments

Powered by Blogger.