Reliance Jio-Facebook करारानंतर मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Reliance Jio-Facebook करारानंतर मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
सोशल मीडिया कंपनी फेसबुकनं (Facebook) फेसबुकनं रिलायन्ससोबत मोठा व्यवहार केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) मध्ये फेसबुकनं 5.7 बिलियन म्हणजे 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या कारारानंतर उद्योगपती मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. त्यांनी चीनमधील अलीबाबाचे संस्थापक जॅक मा या मागे टाकलं आहे.

फेसबुक आणि रिलायन्स जिओ यांच्या कारारानंतरच मुकेश अंबानी यांनी जॅक मा ला मागे टाकतं आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. काल मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 4 अरब डॉलर्सची वाढ होऊन ती आता 49 अरब डॉलर्स एवढी झाली आहे. चीनच्या जॅक मा यांच्या संपत्तीपेक्षा 3 अरब डॉलर्सनी मुकेश अंबानी यांची संपत्ती जास्त आहे.

मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली होती. जवळपास 14 अरब डॉलर्सनी घट झाली होती. तर अरब डॉल संपत्तीत 1 अरब डॉलर्सने घट झाली.
फेसबुक आणि रिलायन्स जिओ यांच्या कारारानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरमध्ये बुधवारी चांगली वाढ झालेली पाहायला मिळाली. एका वेळी तर 11टक्क्यांनी वाढ होत शेअर 1359 वर गेलेला पाहायला मिळाला. काल एका दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला मार्केट कॅपमध्ये 90 हजार कोटींचा फायदा झाला.
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) मध्ये फेसबुकनं 5.7 बिलियन म्हणजे 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बुधवारी फेसबुकनं याबाबत घोषणा केली. एएनआयच्या वृत्तानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio मध्ये 9.99 टक्के हिस्सा 43, 574 कोटी रुपयांना खरेदी करणार आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर फेसबुक रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणारी सर्वात मोठी शेअर होल्डर कंपनी ठरेल.

No comments

Powered by Blogger.