Today Horoscope


मेष : पीडितांना मदत कराल. जवळच्या लोकांच्या सहकार्यामुळे मानसिक ताण कमी होईल. महत्त्वाच्या गोष्टींच्या नोंदी ठेवा.

वृषभ : समस्या सुटतील. तुमच्या सहवासाने प्रिय व्यक्ती खूष होईल. संततीच्या करिअरसंदर्भात सबुरीने निर्णय घ्या.
मिथुन : अकारण चिंता करणे टाळा. समयसूचकता ठेवा. पैशांची उधळपट्टी करणे टाळावे.

कर्क : फुकाचे स्वप्नरंजन नको. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कष्टाची गरज आहे. तातडीने निर्णय घेणे टाळा.

सिंह : घरासंबंधी प्रश्नांवर तोडगा काढावा लागेल. एखादी अयोग्य कृती त्रासदायक ठरू शकते. महत्त्वाची कामे रखडतील.

कन्या : कुटुंबातील सदस्य तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. गैरसमज वाढण्याची शक्यता. उत्तरार्धात सर्व परिस्थिती नियंत्रणात येईल.

तुळ : अफवांवर विश्वास ठेवू नका. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. भविष्यातील तरतुदीसाठी काही योजना आखाल.

वृश्चिक : शीघ्रकोपीपणा अडचणीत भर टाकेल. मानसिक अशांतता राहील. अतिरिक्त कामाचा बोजा घेऊ नका.

धनु : क्लेशदायक घटनांचा काळ. वडिलधाऱ्या व्यक्तीशी मतभेद होतील. कणखर बनाल.


मकर : महत्त्वाच्या भेटी लांबणीवर पडतील. आर्थिक विवंचना सतावेल. आप्तेष्टांचा सल्ला मोलाचा ठरेल.

कुंभ : अकारण चिंता केल्याने विचारशक्ती खुंटेल. आरोग्यावर विपरित परिणाम होण्याआधी जागृत राहा. सकारात्मकतेने निर्णय घ्या.

मीन : अपेक्षित मदत मिळणे दुरापास्त राहील. अडचणींचा सामना करावा लागेल. घाईने निर्णयांची अंमलबजावणी करणे घातक ठरेल.

No comments

Powered by Blogger.