पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी आढळले पाचशे पेक्षा जास्त करोनाबाधित

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ५९५ रुग्ण आढळल्याने, शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या १४ हजार ७८० संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज अखेर शहरात ५७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ३३१ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ८ हजार ६३३ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आज नव्याने १५४ करोना बाधित रुग्ण आढळले असून पैकी ११ बाधित हे ग्रामीण भागातील आहेत. तर आज तीन जणांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. दरम्यान, ११७ जणांना डिस्चार्ज मिळालेला असून शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या २ हजार ४०५ वर पोहचली आहे. पैकी, १ हजार ५९३ जण करोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत ६८ जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ५ हजार २४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे असं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. तसंच जे १७५ मृत्यू गेल्या चोवीस तासांमध्ये नोंदवले गेले आहेत त्यातले ९१ मृत्यू गेल्या ४८ तासांमधले आहेत. तर ८४ मृत्यू मागचे आहेत. सध्याच्या घडीला ६५ हजार ८२९ केसेस पॉझिटिव्ह आहेत असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

No comments

Powered by Blogger.