तुळशीची पाने पोटाची चरबी कमी करण्यासाठी रामबाण, फक्त या प्रकारे वापरा
तुळशीच पान आपल्या आरोग्यसाठी खूप गुणकारी मानले जाते. तुळशीचे असे अनेक फायदे आहेत ज्यामुळे आपल्या शरीरातील लठ्ठपणा कमी होऊ शकतो. त्याच बरोबर इतर आजारांना देखील कमी करू शकतो. हे आर्टिल तुम्हाला घरच्या घरी तुळशीच्या पानाने आजारांना पळून टाकण्यात मदत करेल.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुळशी कशी फायदेशीर आहे?
तुळशी केवळ आयुर्वेदातच नाही तर मॉडर्न सायन्स मध्ये सुधा औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. तुळशीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि मेटाबॉलिज्म वाढवणारे गुणधर्म आढळतात जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेस मदत देते. तुळशीच्या पानांमध्ये असलेले {फायटोन्युट्रिएंट्स} शरीरातील चरबी जाळून त्याचे ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत करतात.
असा पोटाच्या चरबीसह वजनही कमी करा
१) तुळशीचा चहा :तुळशीचा चहा प्याल्याने मेटॅबोलिसम वाढते आणि चरबी कमी होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. यासाठी फक्त ८- १० तुळशीची पाने पाण्यात उकळा. त्यात थोडे मध व थोडा लिंबाचा रस मिसळून ते नियमित सकाळी प्या.
२) तुळस आणि मध :
तुळशीच्या पानांचा रस काढून त्यात मध टाकून सकाळी उपाशी पोटी प्या. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते व चरबी कमी करण्यात मदत करते. हे नियमित प्याल्याने पोटाची चरबी लवकर कमी होते.
३) तुळस आणि आल्याचा काढा पिणे :
तुळशीची पानं आणि आलं पाण्यात उकळून त्याचा कडा बनवा. त्यात थोडे मध मिसळून प्या. ही पद्धत पोटाची चरबी कमी करण्यास उपयुक्त ठरते.
४) तुळशीचे पाने चघळणे :
रोज सकाळी ४-५ तुळशीची पाने उपाशी पोटी चघळल्यानेही पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. तुळशीच्या पानांमुळे पचन क्रिया सुधारते व शरीरात जमा होणारी अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते.
५) तुळस आणि दालचिनीचे पाणी पिणे :
तुळशीची पाने आणि दालचिनी एक ग्लास पाण्यात उकळून हे पाणी प्या. हे पाणी शरीरातील मेटॅबोलिसम समतोल करते व पोटाची चरबी कमी करण्यात प्रभावी ठरते.
तुळशीच्या पानांचे अजून बरेच फायदे आहेत, जसे…
तुळशी केवळ पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते असे नाही तर ती शरीराला इतर अनेक फायदे देखील देते. तुळशीच पान रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, तणाव कमी करते व त्वचा निरोगी ठेवते. याशिवाय तुळशीची पाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते.
Post a Comment