उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक नाही तर ‘या’ पेयाचे सेवन ठरेल फायदेशीर; चिडचिड होईल दूर
Summer tulsi Herbal Drink: आयुर्वेदात तुळशीला 'औषधींची राणी' म्हटले आहे. त्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात, ज्यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. उन्हाळ्यात स्वत:ला हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुम्ही तुळशीच्या ड्रिंकचे सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला उष्मघाताच्या समस्या होणार नाहीत.
तुळशीचे कोल्ड्रिंक बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे. यासाठी 20-25 ताजी तुळशीची पाने पाण्यात उकळा आणि थंड होऊ द्या. नंतर त्यात एक चमचा मध, थोडासा लिंबाचा रस आणि चवीनुसार काळे मीठ घाला. ते चांगले मिसळा आणि फ्रीजमध्ये थंड करा किंवा बर्फ घालून सर्व्ह करा. जर हवे असेल तर त्यात पुदिन्याची पाने आणि भाजलेले जिरे देखील घालता येतात, ज्यामुळे त्याची चव आणखी वाढते. हे पेय नैसर्गिकरित्या ताजेतवाने आहे आणि शरीराला उष्णतेपासून आराम देते.
तुळशी कोल्ड्रिंक पिल्याने शरीराला चिडचिड, थकवा आणि उष्माघातापासून संरक्षण मिळते. त्यासोबतच तुमची पचन सुधारते आणि गॅस, अपचन यासारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम देते. तुळस शरीराला डिटॉक्स करते आणि त्वचा देखील सुधारते. उन्हाळ्यात घाम आणि गरम हवेमुळे येणारा थकवा दूर करण्यासाठी हे पेय खूप प्रभावी आहे. तसेच, हे पेय ताण कमी करते आणि मनाला शांती देते. ते म्हणाले की, तुळशीचे शीतपेय उन्हाळ्यात नैसर्गिक ऊर्जा पेयासारखे काम करते, जे शरीराला कोणत्याही दुष्परिणामांशिवाय थंडावा आणि ताजेपणा देते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी पिणे फायदेशीर असते. त्यामधील यूजेनॉल आणि कैरेयोफिलिन तुमच्याा शरीरातील पैंक्रियाटिक बिटा सेल्सला निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यासोबतच तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तुळशी खाल्ल्यामुळे शरीरातील इन्सुलिनची मात्रा नियंत्रित राहाते.
तुळशीचा तुमच्या त्वचेसाठी देखील वापर केला जाऊ शकतो. तुळशीच्या पानांची पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि 10-15 मिनिटांमध्ये धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सच्या समस्या दूर होतात त्यासोबत तुम्हाला पिग्मेंटेशन किंवा काळ्या डागांच्या समस्या होत नाहीत. तुळशीच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे तुमचा चेहरा अधिच चमकदार आणि निरोगी बनतो. रिकाम्या पोटी तुळशीचे 5-6 पाने चावून खाल्ल्यामुळे तुमची ओरल हेल्थ निरोगी राहाण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत नाही आणि तुमचे दात चमकदार होण्यास मदत होते.
Post a Comment