राज ठाकरेंच्या घरात करोनाचा प्रवेश


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले कृष्णकुंज येथे करोनाने धडक दिली. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी तिघांना करोनाची लागण झाल्याचे समजले होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या घरात काम करणाऱ्या दोघांना करोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करोनाची लागण झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या आधी राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांना करोनाची लागण झाली होती. मात्र, सुदैवाने हे सुरक्षारक्षक करोनामुक्त झाले. पण आता राज यांच्या घरात काम करणाऱ्या दोघांचा करोना तपासणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. यातील एक हा राज ठाकरे यांच्या घरी घरकाम करत होता. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
याआधी राज ठाकरे यांचे दोन वाहन चालक, दोन सुरक्षा रक्षक यांनादेखील करोनाची लागण झाली होती. पण आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

No comments

Powered by Blogger.