आजचे राशीभविष्य
मेष:-कौटुंबिक चर्चेला प्राधान्य द्यावे. घरात काही
नवीन बदल करण्याचा विचार कराल. कामातून मनाजोगे समाधान लाभेल. आळस झटकून
टाकावा. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल.
वृषभ:-परदेशातील आप्तांकडून शुभ वार्ता मिळतील.
दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. प्रत्येक गोष्टीचा रसास्वाद घ्याल. जवळच्या
मित्राची नाराजी दूर करावी. मधुर वाणीने सर्वांना जिंकून घ्यावे.
मिथुन:-उगाचच निषेध नोंदवायला जाऊ नका. बौद्धिक चर्चेत
सहभाग घ्याल. स्वत:चे मत ठसवून सांगा. अती चिकित्सा करू नका. वेळेचे योग्य
नियोजन करा.
कर्क:-कौटुंबिक कामातून आनंद मिळेल. व्यवसायातून
चांगला लाभ होईल. मनाजोगी खरेदी करता येईल. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल.
तब्येतीत सुधारणा होईल.
सिंह:-लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. दिवस मध्यम
फलदायी राहील. किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कलेचे कौतुक केले जाईल.
नवीन लोक संपर्कात येतील.
कन्या:-उगाचच मतभिन्नता दर्शवू नका. वादाच्या
मुद्द्यापासून दूर राहावे. पोटाच्या तक्रारी वाढू शकतात. व्यापक दृष्टिकोन
ठेवावा लागेल. सकारात्मक विचारांची जोड द्यावी.
तूळ:-आजचा दिवस चांगला जाईल. कामे अपेक्षित वेळेत
पूर्ण होतील. उत्साह कमी पडू देऊ नका. नातेवाईकांशी मतभेदाचे प्रसंग येऊ
शकतात. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल.
वृश्चिक:-नवीन कामातून समाधान मिळेल. जोडीदाराचा लाडिक
हट्ट पुरवावा लागेल. वैवाहिक सौख्याने सुखावून जाल. छोट्या प्रवासाचे बेत
आखाल. काही किरकोळ कौटुंबिक कटकटी राहतील.
धनू:-अडचणीतून मार्ग काढणे क्रमप्राप्त आहे. कौटुंबिक
खर्च वाढू शकतात. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. मदतीचा हात
पुढे कराल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
मकर:-धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. घरातील वातावरण
मंगलमय राहील. भावंडांची चिंता लागून राहील. निरूत्साही भावना काढून टाका.
शांत व संयमी विचार करावा.
कुंभ:-संपर्कातील लोकांची मदत मिळेल. चारचौघांत
कौतुकास पात्र व्हाल. बौद्धिक दृष्टिकोन ठेवून विचार कराल. घरातील
स्वच्छतेबाबत दक्षता बाळगाल. बागकामाची आवड जोपासाल.
मीन:-क्रोध वृत्तीला आवर घालावी. जोमाने कामे पूर्ण
कराल. मेहनतीला कमी पडू नका. सारासारविचार करून वागणे ठेवा. स्वतंत्र
वृत्तीचा आग्रह धराल.
-ज्योतिषी विद्याधर करंदीकर
Post a Comment