रेल्वेने ज्योतिर्लिंगांचे दर्शन; तिकीटाचे पैसे EMI ने भरा; भारतीय रेल्वेची आजपर्यंतची सर्वात जबरदस्त योजना
आता रेल्वे ने ज्योतिर्लिंगांचे दर्शन करता येणार आहे. विशेष म्हणजे EMI ने याचे पैसे भरता येणार आहेत.
Indian Railways tour Jyotirlingas In India : भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. आयुष्यात एकदा तरी यापैकी काही ज्योतिर्लिंगांचे दर्शन करावे अशी अनेकांची इच्छा असते. प्रत्यक्षात मात्र, अनेकांना हे शक्य होत नाही. आता रेल्वेने ज्योतिर्लिंगांचे दर्शन करता येणार आहे. सर्वात खास म्हणजे तिकीटाचे पैसे EMI ने भरता येणार आहेत. भारतीय रेल्वेची आजपर्यंतची सर्वात जबरदस्त योजना आहे.
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीने (IRTC) देशातील आणि परदेशातील महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्यासाठी ट्रेनपासून ते विमानांपर्यंत वेगवेगळे पॅकेजेस लाँच केले आहेत. IRTC ने ट्रेनद्वारे 7 ज्योतिर्लिंगांना भेट देण्यासाठी टूर पॅकेज आणले आहे. विशेष म्हणजे प्रवासी या पॅकजेचा खर्च हप्त्यांमध्ये किंवा EMI द्वारे देऊ शकतात.
आयआरसीटीसी भारत गौरव ट्रेनद्वारे देशातील विविध धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी टूर पॅकेज सुरु केले आहेत. या पर्यटन ट्रेनद्वारे 7 ज्योतिर्लिंगांना भेट देण्यासाठी एक टूर पॅकेज सुरु करण्यात आले आहे. 11 एप्रिलपासून ज्योतिर्लिंग टूर सुरू होणार आहे. 22 एप्रिल 2025 पर्यंत हे सुरु राहणार आहे. हे टूर पॅकेज 11 रात्री आणि 12 दिवसांसाठी आहे.
या टूर पॅकेजअंतर्गत प्रवाशांना उज्जैनमधील महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, गुजरातमधील सोमनाथ आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग, नाशिकमधील द्वारकाधीश मंदिर, भेट द्वारका आणि सिग्नेचर ब्रिज, त्रयंबकेश्वर ज्योतिर्लिंग, पंचवटी आणि काळाराम मंदिर, पुण्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग, औरंगाबादमधील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि स्थानिक मंदिराचे दर्शन घेता येणार आहे. योगनगरी ऋषिकेश, हरिद्वार, मुरादाबाद, बरेली, शाहजहानपूर, हरदोई, लखनऊ, कानपूर, ओरई, झाशी, ललितपूर येथून ही ज्योतिर्लिंगांचे दर्शन ट्रेन पकडता येणार आहे.
23 हजार रुपयांपासून ते 52 हजार रुपयांपर्यंत हे टर पॅकेज असणार आहे. यामध्ये हॉटेमध्ये राहण्याचा खर्चाचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे या टूर पॅकेजवर होणारा खर्च प्रवासी सोप्या ईएमआयद्वारे भरू शकतात. या प्रवासात लोकांच्या सोयीसाठी, आयआरसीटीसी विविध बँकांद्वारे दरमहा 816 रुपयांचा ईएमआय पेमेंट सुलभतेने करण्याची व्यवस्था करत आहे. कमी उत्पन्न गटातील लोकांनाही या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा हा त्याचा उद्देश आहे. यामध्ये एलटीसी सुविधा उपलब्ध आहे. इच्छुक पर्यटक आयआरसीटीसी वेबसाइट www.irctctourism.com वरून ऑनलाइन बुकिंग करु शकतात.
Post a Comment