Virat Kohli : हेच संस्कार ! विराट कोहली कोणाच्या पाया पडला ? पाहून तुम्हीही म्हणाल..
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी शानदार सेलिब्रेशन केलं. या विजयासह भारतीय संघाने एकूण तीन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं असून 9 महिन्यात भारतीय संघाने दुसऱ्यांदा मोठी स्पर्धा जिंकली आहे.
विराटने धाव घेतली आणि त्या महिलेच्या पाया पडला
एकीकडे भारतीय संघातील खेळाडू विजयाचे सेलिब्रेशन करत होते, मात्र त्या दरम्यानही विराट कोहलीचे पाय जमिनीवरच होते, तो त्याचे संस्कार विसरला नाही. टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये फक्त एकमेकांबद्दल प्रेम नव्हे तर एकमेकांच्या कुटुंबाबद्दलही खूप आदर आहे, हेच दिसून आलं.
तर झालं असं की फायनलमधील विजयानंतर खेळाडूंना स्टेजवर बोलावण्यात आलं आणि मेडंलही देण्यात आलं. त्यावेळी खेळाडूंचे कुटुंबीयही मैदानात उपस्थित होते. त्यामध्ये भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी याच्या घरच्यांचाही समावेश होता. शमीची आई तेव्हा विराटच्या समोर आली. त्यांना पाहून विराटच्या चेहऱ्यावरही हास्य फुललं. तो सुहास्य वदनाने पुढे धावत आला आणि समोर येत खाली वाकून तो शमीच्या आईच्या पाया पडला. विराटने त्याच्या संस्कारांची जाणीव ठेवत, त्या माऊलीला वाकून नमस्कार केला.
शमीच्या कुटुंबियांसोबत काढला फोटो
कोहलीची ती कृती पाहून शमी आणि त्याची आई यांच्या चेहऱ्यावरही हसू होतं. शमीच्या आईने विराटच्या पाठीवर हात ठेवत त्याला आशीर्वाद दिले. त्यानंतर फोटो सेशनही झालं. यावेळी मोहम्मद शमीची बहीण आणि भाऊही एकत्र दिसले. हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं. सोशल मीडियावर ज्यांनी हे फोटो पाहिले, त्या सर्वांनीच विराटचं भरभरून कौतुक केलं. आई अखेर आईच असते, असे म्हणत युजर्सनी या व्हिडीओवर भरभरन कमेंट्स केल्या.
‘ कोहलीने फोटो काढण्यापूर्वी शमीच्या आईचे आशीर्वाद घेतले, ज्याला ॲटीट्युडमुळे जज केले जाते, त्याच खेळाडूवर (विराट) चांगले संस्कार आहेत’, असं एका युजरने लिहीलं. ‘ ही किती प्रेमळ कृती होती.’ असंही एकाने लिहीत विराटतं कौतुक केलं. त्याची ही कृती सर्वांनाच भावल्याचे दिसत आहे.
Post a Comment