आजचे राशीभविष्य
मेष:-एकमेकांना उत्तम प्रकारे समजून घ्याल. कौटुंबिक
सौख्य वाढीस लागेल. आवडत्या वस्तू खरेदी कराल. झोपेची तक्रार कमी होईल.
हातात नवीन अधिकार येतील.
वृषभ:-कर्तृत्वाची योग्य जाणीव ठेवाल. आध्यात्मिक
गोष्टींत प्रगती करता येईल. उपासनेला अधिक बळ मिळेल. तात्विक गोष्टींवर
मतभेद संभवतात. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे.
मिथुन:-कमिशनमधून लाभ मिळेल. नाटक सिनेमा पहायला जाल. छंद जोपासला वेळ मिळेल. लहान सहान दुखण्याकडे दुर्लक्ष नको. काही कामे अधिक वेळ घेतील.
कर्क:-मौल्यवान वस्तूची खरेदी कराल. स्त्रियांशी
मैत्री वाढेल. घरगुती वातावरण खेळीमेळीचे राहील. तुमच्यावर जोडीदाराचा
प्रभाव राहील. वरिष्ठांना नाराज करू नका.
सिंह:-पित्त विकार बळावू शकतात. सहकुटुंब जवळचा प्रवास
कराल. निसर्गाच्या सान्निध्यात रमून जाल. सौंदर्यप्रसाधनेच्या वस्तु खरेदी
कराल. तुमच्यातील चांगल्या गुणांची दाखल घेतली जाईल.
कन्या:-कौटुंबिक सौख्य वाढेल. जोडीदाराच्या प्राप्तीत
वाढ होईल. संपर्कातील लोकांची गाठ घेता येईल. मनाची विशालता दाखवाल. उच्च
रहाणीमानाची आवड जोपासाल.
तूळ:-दिवस मनाजोगा व्यतीत कराल. व्यवसायातून चांगला
धनलाभ होईल. कामे वेळेवर पूर्ण होतील. घरातील गोष्टींमध्ये लक्ष घालावे.
चैनीच्या वस्तू खरेदी कराल.
वृश्चिक:-मानसिक चांचल्य जाणवेल. जोडीदाराचा वरचष्मा
राहील. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल. मुलांशी मतभेद संभवतात. भावंडांचे
प्रश्न सामोरी येतील.
धनू:-व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. काहीसा
आळशीपणा जाणवेल. जवळचे नातेवाईक भेटतील. योग्य संधीची वाट पहावी लागेल.
लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे.
मकर:-उगाच चिडचिड करू नये. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. तुमचा तर्क अचूक ठरेल. अती चौकसपणा दाखवू नका.
कुंभ:-कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. घरगुती वापरासाठी
वस्तूची खरेदी कराल. ध्यान धारणे साठी वेळ द्यावा. आर्थिक व्यवहार जपून
करावेत. कोर्ट-कचेरीची कामे निघतील.
मीन:-व्यवसाय वृद्धीकडे मार्गक्रमण करावे. मुलांच्या
आरोग्याकडे वेळीच लक्ष द्यावे. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. आपल्याच
मतावर आग्रही राहाल. धूर्तपणे वागणे ठेवाल.
-ज्योतिषी विद्याधर करंदीकर
Post a Comment