सरकारचा सुनील गावस्कर यांना दणका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट निष्फळ?
भारताचा
माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना मोठा धक्का
बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने
(Maharashtra Housing and Area Development Authority) वांद्रे येथील 21
हजार 348 स्क्वेअर फुटांचा भूखंड जप्त करण्याची तयारी तयारी दर्शविली आहे.
सुनील
गावस्कर यांना क्रिकेट अकादमी उभारण्यासाठी 31 वर्षांपूर्वी (1988मध्ये)
सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला हा भूखंड देण्यात आला होता. मात्र
आता म्हाडाच्या वतीनं गावस्कर यांना दिलेला भुखंड जप्त करण्यात आल्याचे
सांगितले. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष
आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद महास्कर यांनी इंडियन एक्सप्रेसला
दिलेल्या मुलाखतीत हा भुखंड परत घेण्यासाठी सरकारकडे संपर्क साधला आहे.
31 वर्षांपूर्वी जमीन देण्यात आली होती
मिलिंद
यांनी दिलेल्या माहितीनुसार, '31 वर्षांपूर्वी क्रिकेट अकादमी
उभारण्यासाठी जमीन देण्यात आली होती. परंतु अकादमीचे बांधकाम अद्याप झाले
नाही. त्यामुळं हा भुखंड जप्त करण्यासाठी आम्ही सरकारकडे प्रस्ताव पाठविला
आहे. अधिकृत नोंदीनुसार महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास
प्राधिकरणाने सुनील गावस्कर क्रिकेट फाऊंडेशन ट्रस्टला वांद्रे येथील
रंगशारदा सभागृहजवळ क्रिकेट अकादमी तयार करण्यासाठी जमीन भाड्याने दिली
होती. 1999, 2000 आणि 2007 या वर्षात वाटपासंदर्भात अटी व शर्ती सुधारित
केल्या गेल्या, परंतु फाउंडेशनने अद्याप कोणतेही बांधकाम केलेले नाही’, असे
सांगितले.
सुनील गावस्कर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली
मुख्य
म्हणजे 24 डिसेंबर रोजी सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांनी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथील निवासस्थानी
घरी भेट घेतली होती. दरम्यान या बैठकीत गावस्कर यांच्या भुखंडाबाबत चर्चा
झाली की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र मुंबई क्रिकेट
असोसिएशनचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना 27 डिसेंबर
रोजी या बैठकीचा हवाला देऊन एक पत्र लिहिले होते, ज्यात ते म्हणाले
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाची कारवाई कायदेशीर
असल्याचे सांगितले होते.
Post a Comment