आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य
  1. मेष : नोकरीत बढतीचे योग. प्रिय व्यक्ती भेटेल. थोरामोठ्यांचा आशीर्वाद लाभेल. 
  2. वृषभ : वैवाहिक आयुष्यातील मोहक क्षण अनुभवाल. परगावच्या नातेवाइकांकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता. संतती कामात मदत करेल. 
  3. मिथुन : अंगीभूत गुणांनी कार्यरत राहिल्याने फायदेशीर व्यवहार होतील. अडचणी किंवा समस्यांचे थोतांड मांडू नका. दिवस धावपळीचा राहील.
  4. कर्क : निरपेक्ष मैत्री निभावा. वाईट सवयींपासून दूर राहा. बेरोजगारांनी नोकरी मिळण्यासाठी अधिक कार्यक्षमतेने पावले उचलावीत. 
  5. सिंह : मनाप्रमाणे घटना घडतील. महागड्या वस्तूंची खरेदी कराल. उत्साह व प्रसन्नतेने भरलेला दिवस राहील. 
  6. कन्या : लहान व्यावसायिकांना मैत्रीतून मोलाचा सल्ला मिळेल. आयुष्यातील ताणतणाव कमी होतील. आर्थिक स्थिती समाधानकारक असेल. 
  7. तुळ : पाहुणे येण्याची शक्यता. नवीन योजना अमलात आणाल. गुंतवणूक करण्यापूर्वी ज्येष्ठांचा सल्ला घ्या. 
  8. वृश्चिक : आर्थिक अडचणी आल्या, तरी डगमगू नका. व्यवसायात भागीदारी तूर्तास नको. स्वत:साठी वेळ काढाल. 
  9. धनु : पतपेढी किंवा बँकेच्या बाबतीत व्यवहार करताना निष्काळजीपणा टाळा. ओळखीच्या व्यक्तीची मदत मिळेल. पूर्वी घडून गेलेल्या चुकांकडून शिकवण घ्या. 
  10. मकर : निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. सहकर्मचाऱ्यांबरोबर असलेले मतभेद संपुष्टात येतील. 
  11. कुंभ : आवडत्या व्यक्तीच्या मागण्या वाढतील. कौशल्याने कामाची पूर्तता करा. अडचणी सोडवायला आप्तेष्ट मदत मागतील.
  12. मीन : कठीण प्रसंगात मोठा भाऊ पाठराखण करेल. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा. आपल्या ज्ञानाचा इतरांना फायदा होईल.  -पं. डॉ. संदीप अवचट 

No comments

Powered by Blogger.