पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय युद्ध स्मारकात सैनिकांना श्रद्धांजली
![]() |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय युद्ध स्मारकात सैनिकांना श्रद्धांजली |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात पुष्पहार घालून आपले कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली वाहताना देशाचे नेतृत्व केले. सीडीएस जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल नरवणे, नेव्ही चीफ अॅडमिरल करंबीर सिंह, हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल आरकेएस भदूरिया उपस्थित होते.
१९७२ साली इंडिया गेट येथे १९७१ च्या भारत-पाक युद्धातील शहिदांच्या
स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आले होते. यंदा प्रजासत्ताक दिनाच्या
सोहळ्यात सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सहभागी झाले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडिया गेट येथील अमर ज्योती जवान येथे प्रथम न
जाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४८ वर्षांची परंपरा मोडीत काढली.
त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे गेल्या वर्षी २५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान
मोदी यांनीच उद्घाटन केले होते.
Post a Comment