रत्नागिरीमधील तीन विद्यार्थिनी चीनमध्ये अडकल्या

रत्नागिरीमधील तीन विद्यार्थिनी चीनमध्ये अडकल्या
कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप आणण्यासाठी केंद्र सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे. चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये महाराष्ट्रातील काहीजण असून यामध्ये रत्नागिरीमधील तीन मुलींचा समावेश आहे. या मुली खेड तालुक्यातील असून चीनमधील नानटॉग प्रांतातील विद्यापीठात शिक्षणासाठी गेल्या आहेत. दरम्यान या तिन्ही विद्यार्थिनी सुरक्षित असून त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
सुमेना मुनीर हमदुले, झोया महवाश हमदूले आणि सादिया बशीर मुजावर अशी या तीन विद्यार्थिनींची नावे आहेत. विद्यार्थिनींपैकी सादिया बशीर मुजावर हिच्याशी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दूरध्वनीवर संपर्क करून संवाद साधला. यावेळी मुली सुखरुप असल्याची माहिती त्यांनी दिली.
सध्या त्यांच्या सुट्ट्यांचा कालावधी आहे. या सुट्ट्या 23 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहेत. चीनमधील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे कुणालाही घराबाहेर जाण्याची मुभा दिलेली नाही. त्यामुळे या तिघीजणी घरातच आहेत. या मुलींना भारतात सुखरूप आणण्यासाठी दूतावासामार्फत प्रयत्न सुरू झाले आहेत. चीनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. हे विद्यार्थी पुणे, पिंपरी चिंचवड, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेडमधील येथील आहेत. ही मुलं युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत आहेत.

No comments

Powered by Blogger.