धनंजय मुंडे यांच्याबदल संजय राऊत यांचा खुलासा

धनंजय मुंडे यांच्याबदल संजय राऊत यांचा खुलासा

अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत जेव्हा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती त्यावेळी धनंजय मुंडेही तिथे उपस्थित असल्याचं सांगितलं जात होतं. त्यावेळी धनंजय मुंडे वाय बी सेंटरला कसे परते असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी संजय राऊत यांनी एक खुमासदार किस्सा सांगितला.
महाविकासआघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाणार हे आम्हाला माहीत होतं. हा गोंधळ सुरू होता त्यावेळी मला सांगण्यात आलं धनंजय़ मुंडेही तिथे उपस्थित आहेत. मात्र मी ठामपणे सांगितलं धनंजय मुंडे आमच्यासोबत आहेत. धनंजय मुंडेंसोबत माझं बोलणं झालं आहे आणि ते पुढच्या 15 मिनिटांत इथे पोहोचत आहेत. धनंजय मुंडेंनी टीव्हीवर हे पाहिलं असेल आणि नंतर त्य़ांना यावं लागलं. प्रत्यक्षात त्यावेळी बोलणं झालं नसलं तरीही आम्हाला फाजिल आत्मविश्वास होता धनंजय मुंडे आमच्यासोबतच आहेत. त्या आत्मविश्वासाच्या जोरावर धनंजय मुंडे वाय बी सेंटरवर परतले. संजय राऊत यांनी सांगितलेल्या या प्रसंगानंतर मात्र उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
संजय राऊत काय  म्हणाले 
-आमची गाडी घसरणार नाही याची खात्री
-अजित पवार हे महत्त्वाचा नेते
-आम्ही हे सरकार चालवणार
-खाणारी खाती ठेवली नाहीत
-हे सरकार टिकणार लोकांच्या भावना सकारात्मक 100 दिवस होतील 5 वर्ष चालणारम
-आम्ही पूर्ण पाच वर्ष चालवणार
-लोकांमधल्या भावना सकारात्मक
-आम्हाला राज्य चालवायचा उत्तम अनुभव
-आम्ही आकडा लावतो आकडे कळत नाही
-प्रत्येक खातं राज्यासाठी महत्त्वाचं असतं
-आम्हाला आकडा कळत नाही
-राष्ट्रवादी आणि कॉग्रेस महाराष्ट्राच्या मातीतले पक्ष
- मी दाऊद इब्राहिमलाही दम दिला होता , तो काळ वेगळा होता
-ज्यांना सत्ता मिळाला नाही ते म्हणतात की संजय राऊत यांच्यामुळे घास गेला
-माझ्यावर बाळासाहेबांचा खूप प्रभाव
-राज ठाकरे आजही माझे मित्र
-शरद पवार यांच्या वर माझा विश्वास आणि श्रद्धा
-इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी

No comments

Powered by Blogger.