कोरोना विषाणूच्या लागणची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

 कोरोना विषाणूच्या लागणची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

सध्या चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसची चर्चा सर्वत्र रंगत आहे. आतापर्यंत या विषाणूने एकूण २५ जणांचा बळी घेतला. तर ८३० जणांना या धोकादायक व्हायरसची लागण झाली आहे. जागतिक आरोग्य संस्थने (WHO) भारत देशासोबतच अन्य देशांना देखील सतर्कतेचा इशारा देत हा व्हायरस अत्यंत धोकादायक असल्याचं सांगितले आहे. या व्हायरसमुळे सामान्य लोकांचा बळी जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. चीनसोबतच आता थायलँड, सिंगापूर, मलेशिया या देशांमध्ये देखील या विषाणूचा धोका पसरत आहे. 
कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी खास उपाय

- सर्दी किंवा फ्लूसारखी लक्षणे असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क साधणे टाळा.
- हात  स्वच्छ करण्यासाठी साबण किंवा हॅंड वॉश कायम जवळ ठेवा. 
- मांस आणि अंडी योग्य प्रकारे शिजवून घ्या.
- खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रूमाल ठेवा. 

करुणा विषाणूचा प्रसार होण्यापासून कसा रोखायचा?
हा प्राणघातक विषाणू पसरण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची गरज आहे. डब्ल्यूएचओने देखील या प्राणघातक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना दिली आहेत.
- आजारी रुग्णांचे योग्य प्रकारे देखरेख ठेवणे
- श्वसन म्हणजे जर आपल्याला श्वसन रोगाची लक्षणे दिसली तर त्यापासून दूर रहा.
- ज्या देशांमध्ये किंवा रोगाचा प्रसार झाला आहे अशा ठिकाणी जाणे टाळा
- हात पूर्णपणे धुवा आणि हात स्वच्छतेची काळजी घ्या
- खोकताना किंवा शिंकताना आपले तोंड आणि नाक चांगले झाकून ठेवा
- डोळे, नाक आणि तोंड वारंवार हात आणि बोटांनी स्पर्श करू नका
- सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक वाहतुकीत कोणत्याही गोष्टीला हात लावण्यास किंवा हात हलवू नका
चीन सरकारने या बातमीला दुजोरा दिल्यानंतर जागतिक आरोग्य संस्थेने संपूर्ण जगाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. देशात या विषाणूच्या लागणीचे नमुने तपासण्यासाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद समन्वयाने काम करणार आहेत. सध्या जगातील विविध प्रयोगशाळांमध्ये कोरोना वायरसवर अधिक अभ्यास सुरू आहे.

No comments

Powered by Blogger.