नवीन वर्षाचा पहिला सामना पावसामुळे रद्द
२०२० वर्षात भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झालेली नाहीये. श्रीलंकेविरुद्धचा पहिला टी-२० सामना पाऊस आणि खराब खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला आहे. नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिला चेंडू टाकण्याच्या आधीच गुवाहटीत पावसाला सुरुवात झाल्यामुळे, सामना सुरु करण्यास विलंब झाला. काही कालावधीनंतर पावसाने उसंत घेतली, मात्र खेळपट्टीवरचा काही भाग ओलसर राहिला होता. हा भाग सुकवण्यात मैदानातील कर्मचाऱ्यांना अपयश आल्यामुळे अखेरीस पंचांनी हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेतला दुसरा सामना मंगळवारी इंदूरच्या मैदानावर खेळवला जाईल.
Post a Comment