जिओकडून थायलंडला जाण्याची संधी :Jio's Got Talent Competition

जिओकडून थायलंडला जाण्याची संधी :Jio's Got Talent Competition
रिलायन्स जिओने भारतात डिजिटल क्रांती घडविली आहे. कमी दरांमध्ये 4 जी सेवा लाँच करून प्रस्थापित कंपन्यांनाच धडकी भरवली आहे. आता जिओ ग्राहकांना मोफत थायलंडला जाण्याची संधी देत आहे.
जिओने ग्राहकांसाठी 'Jio Got Talent' नावाची स्पर्धा सुरू केली आहे. हे चॅलेंज चार फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेमध्ये ग्राहकांना अनेक बक्षिसे मिळणार आहेत. याशिवाय ग्राहकांना थायलंडला जायची संधीही मिळणार आहे. यासाठी ग्राहकांना स्नॅपचॅटवर एक क्रिएटिव्ह व्हिडीओ बनवावा लागणार आहे.
कंपनीने या स्पर्धेमध्ये सोशल मिडीया साईट स्नॅपचॅटसोबत करार केला आहे. बक्षिस जिंकण्यासाठी ग्राहकांना 10 सेकंदांचा व्हिडीओ बनवावा लागणार आहे. यासाठी एक खास लेन्स देण्यात येणार आहे. याद्वारे युजर आकर्षक व्हिडीओ बनवू शकणार आहे. 

यासाठी काय करावे लागेल?
  1. सर्वात आधी तुम्हाला स्नॅपचॅटमध्ये स्नॅप कोड़ला स्कॅन करावे लागेल.
  2.  यानंतर जिओ गॉट टॅलेंट लेन्स ओपन करावी लागेल।
  3.  येथे तुम्ही १० सेकंदांचा व्हिडीओ रेकॉर्ड करू शकता.  
  4. हा व्हिडीओ ‘Our Story’ मध्ये अपलोड करावा लागणार आहे.

No comments

Powered by Blogger.