जनगणनेमुळे ओबीसी वर्गाला न्याय मिळेल - पंकजाताई मुंडे

 पंकजाताई मुंडेनी राज्य विधीमंडळातील प्रस्तावाच्या मंजूरीचे केले स्वागत


आगामी राष्ट्रीय जनगणनेत इतर मागास प्रवर्गातील नागरिकांची स्वतंत्र नोंद करण्यात यावी या  राज्य विधीमंडळातील प्रस्तावाच्या मंजूरीचे पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले आहे, या जनगणनेमुळे ओबीसी वर्गाला न्याय मिळेल अशी भावना त्यांनी ट्विट द्वारे व्यक्त केली आहे. 

  २०२१ मध्ये होणा-या राष्ट्रीय जनगणनेत इतर मागास प्रवर्गातील नागरिकांची स्वतंत्र नोंद करण्यात यावी असा प्रस्ताव राज्य विधीमंडळात एकमताने मंजूर झाला, यावर पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करतांना 'ओबीसी  जनगणना होणे हेच पाहिलं पाऊल! हे पाऊल ओबीसींना न्याय देण्यासाठीच्या भविष्याकडे नेईल.विधानसभेचा हा निर्णय ओबीसींना ताकद द्यावा, निर्णय केवळ राजकीय नाही हा विश्वास ओबीसी  मध्ये दृढ करणे आवश्यक आहे ' असे म्हटले आहे
या आधी ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी स्वर्गीय केंद्रीय मंत्री लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे व नंतर आता त्यांची कन्या  खासदार प्रीतम गोपीनाथ मुंडे हे आग्रही  होते.

No comments

Powered by Blogger.