आजचे राशीभविष्य

मेष : आज जास्तीत जास्त कामे होतील. त्याप्रमाणे कामाचे नियोजन करा. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.
वृषभ : नोकरीत काम वाढेल. धंद्यात फायदा होईल. हिशोब नीट करा. धावपळ होईल. वाहन नीट चालवा.
मिथुन : ठरविलेले काम करून घ्या. धंद्यातील केलेला वादा निभावता येईल. गोड बोलून तुमचे हित साधा.
कर्क : कोर्टाच्या कामाला दिशा मिळेल. धंद्यात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल.
सिंह : घरगुती कामे करून घ्या. सरकारी कामे रेंगाळत ठेऊ नका. थकबाकी वसूल करा. मैत्री वाढेल.
कन्या : धंद्याला नवी दिशा देता येईल. थकबाकीसाठी प्रयत्न करा. नोकरीत प्रभाव पडेल.
तूळ : नवीन ओळख होईल. नोकरीत काम वाढले तरी मदत मिळेल. खरेदी कराल. स्पर्धेत कौतुक होईल.
वृश्चिक : तुमच्या मनाचा गोंधळ होऊ शकतो. राग आवरा. वाहन जपून चालवा. रेंगाळत न राहता कामे करा.
धनु : आज महत्त्वाचे काम करून घ्या. आळस करू नका. पाहुण्यांचे स्वागत कराल. ओळखी होतील.
मकर : कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळवता येईल. घरातील कामे होतील. नोकरीत तुम्हाला मानाचे काम दिले जाईल.
कुंभ : दुसर्‍यांनी केलेल्या चुका सुधारण्याचे काम करावे लागेल. नम्रपणे बोला. काम पूर्ण करू शकाल. मैत्री होईल.
मीन : वाहन जपून चालवा. मैत्रीत गैरसमज होईल. खाण्याचे तंत्र सांभाळून घ्या. व्यवहारात फायदा होऊ शकतो.

No comments

Powered by Blogger.