हिंगणघाट : पोलिसांनी आरोपीला सकाळी 6 वाजताच केलं कोर्टात हजर

हिंगणघाट : नागरीक आक्रमक, पोलिसांनी आरोपीला सकाळी 6 वाजताच केलं कोर्टात हजर
हिंगणघाट : पोलिसांनी आरोपीला सकाळी 6 वाजताच केलं कोर्टात हजर

 हिंगणघाटमधल्या घटनेला 6 दिवस झाले आहेत. पीडितेवर नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम प्रयत्नांची शर्थ करत असली तरी पीडितेची प्रकृती चिंताजनकच असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. एका तरुणाने प्राध्यापक असलेल्या पीडितेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ती 40 टक्के भाजली होती. त्यानंतर तातडीने तिला नागपूरला हलविण्यात आलं होतं. पेट्रोलच्या धुरामुळे तिच्या श्वसन नलिकेत धुर गेला आणि ती भाजली गेली.

हिंगणघाट जळीत प्रकरणातला आरोपी आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्याच्या विरुद्ध नागरीक आक्रमक असल्याने त्याला पहाटे 6 वाजताच न्यायालयात हजर करण्यात आलं. सकाळी पहाटेदरम्यान न्यायाधीश रत्नमाला डफरे यांच्या न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी गुप्तता पाळत हजर केलं.
एमसीआर देत आरोपीची जेलमध्ये रवानगी झाल्याची माहिती आहे. पोलीस याबाबत गमालीची गुप्तता पाळत आहेत.
त्यामुळे श्वास घेण्यास तिला त्रास होतोय. तर डोळ्याच्या वरचा भाग, कानही जळाले आहेत. तिला अजुनही बोलता येत नाही. पुढचे काही दिवस तिच्यासाठी महत्त्वाचे असून मुंबईचे डॉक्टरही नागपूरात दाखल झाले आहेत. तिच्या उपचाराचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकार करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय.
गृहमंत्री अनिल देशमुख हे मंगळवारी मुंबईतले ख्यातनाम त्वचा तज्ज्ञ डॉ. सुनील केशवानी यांना नागपूरला घेऊन गेले होते. पीडित मुलीसाठी आजचा दिवस म्हणजे पुढचे 24 तास महत्त्वाचे असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असून तिच्या प्रकृतीसाठी सर्व राज्यातून प्रार्थना करण्यात येत आहे. 

No comments

Powered by Blogger.