प्रिती झिंटाला मोठा झटका

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी एका महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. दरम्यान चाहत्यांमध्ये या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र या स्पर्धेआधीच किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला मोठा झटका बसला आहे. हाताला दुखापत झाल्यामुळं ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आयपीएलचे सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही आहे.
मॅक्सवेलच्या डाव्या हाताच्या कोपरात दुखापत झाली आहे. यामुळे तो दक्षिण आफ्रिका दौर्‍यातही सामिल होणार नाही आहे. मॅक्सेवेलच्या त्याच्या जागी डार्सी शॉर्टला संघात समावेश करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. 3 टी -20 आणि तत्सम एकदिवसीय सामने दोन्ही देशांमध्ये खेळले जाणार आहेत. पहिला टी 20 21 फेब्रुवारी रोजी जोहान्सबर्गमध्ये खेळला जाईल.
गुरुवारी मॅक्सवेलवर शस्त्रक्रिया होणार आहेत. या सामन्यात पूर्णपणे फिट होण्यासाठी त्यांना 6 ते 8 आठवडे लागू शकतात. याचा अर्थ असा की 29 मार्चपासून सुरू होणार्‍या आयपीएलचा सलामीचा सामना ते खेळू शकणार नाहीत. लिलावात पंजाबने त्याला 10.75 कोटींमध्ये खरेदी केले. मॅक्सवेल दक्षिण आफ्रिका दौर्‍याबाहेर गेल्यानंतर, या दौर्‍यामधून माघार घेणे मला सोपे नव्हते. सध्याच्या कोपर दुखापतीमुळे मी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करू शकतो यावर माझा विश्वास नव्हता. म्हणून मी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ", असे सांगितले होते. याआधी मॅक्सवेलनं मानसिक स्वास्थ्य ठिक नसल्यामुळं क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता.

No comments

Powered by Blogger.