बजाजच्या Pulsar मध्ये नवीन इंजिन, मायलेज वाढला
![]() |
बजाजच्या Pulsar मध्ये नवीन इंजिन, मायलेज वाढला |
Bajaj Auto ने बुधवारी आपली पॉप्युलर बाइक Pulsar 150 बीएस-6 इंजिनसह लाँच केली आहे. BS6 Pulsar 150 ही बाइक स्टँडर्ड डिस्क ब्रेक आणि ट्विन डिस्क ब्रेकमध्ये उपलब्ध असेल. बीएस6 मध्ये अपडेट करण्यासोबतच आता या बाइकमध्ये फ्युअल इंजेक्शन सिस्टिम देण्यात आली आहे. बीएस-4 व्हर्जनच्या तुलनेत बीएस-6 पल्सरच्या इंजिनमुळे गाडीचा परफॉर्मन्स अजून चांगला होईल आणि अधिक मायलेज देईल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. बजाज पल्सर 150 ही बाइक तीन व्हेरिअंटमध्ये येते, या दोन व्हेरिअंटव्यतिरिक्त सर्वात स्वस्त व्हेरिअंट पल्सर 150 नियॉन आहे. पण अद्याप कंपनीने नियॉनसाठी बीएस-6 व्हेरिअंटची घोषणा केलेली नाही.
बीएस6 पल्सरच्या 150 स्टँडर्ड डिस्क ब्रेक व्हेरिअंटची किंमत 94 हजार 956 रुपये आणि ट्विन डिस्क व्हेरिअंटची किंमत 98 हजार 835 रुपये ठेवण्यात आली आहे. ही एक्स-शोरूम किंमत आहे. बीएस-4 व्हर्जनच्या तुलनेत बीएस-6 व्हर्जनची किंमत 8 हजार 998 रुपयांनी वाढलीये. या बाइकच्या लाँचिंगसोबतच कंपनीचे इतर प्रोडक्ट्स बीएस-6 मानकांनुसार अपडेट करण्याची प्रक्रिया जारी असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
बजाज पल्सर 150 मध्ये 149.5 cc,सिंगल-सिलिंडर, 4-स्ट्रोक इंजिन आहे. बीएस-6 व्हेरिअंटमध्ये हे इंजिन 13.8 bhp ऊर्जा आणि 13.25 Nm टॉर्क निर्माण निर्माण करते. बीएस-6 इंजिनचे पावर आउटपुट बीएस-4 व्हर्जन इतकेच आहे, पण टॉर्क थोडा कमी झालाय.
Post a Comment