आजचे राशीभविष्य

 • मेष:-वागण्या-बोलण्यात काहीसा हटवादीपणा येईल. कामात गतीमानता येईल. स्वत:बद्दलच्या नसत्या कल्पना बाजूला साराव्यात. बुद्धिचातुर्याने कामे कराल. परिस्थितीनुरूप वागणे ठेवाल.
 • वृषभ:-वागण्यात कर्मठपणा आणाल. वडिलांचा मान ठेवून निर्णय घ्यावा. प्रगल्भतेने वागणे ठेवाल. न्यायी वृत्तीने मत मांडाल. नवीन विचार आत्मसात करावेत.
 • मिथुन:-प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. आरोग्याची काळजी घ्यावी. अति विचार करू नका. अचानक धनलाभ संभवतो. मनातील आकांक्षा पूर्ण होईल.
 • कर्क:-शांत व संयमी विचार कराल. वैचारिक आधुनिकता ठेवावी. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. भावंडांना मदत कराल. घराची सजावट कराल.
 • सिंह:-चुकीच्या लोकांमुळे मन:स्ताप होण्याची शक्यता आहे. परिस्थिती जाणून योग्य मार्ग काढावा. सर्दी, खोकला यांसारखे त्रास संभवतात. वाताचे विकार बळावू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढवू नका.
 • कन्या:-मनातील नसते संशय काढून टाकावेत. अत्यंत व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. आपल्या बुद्धिमत्तेचा सदुपयोग करावा. दीर्घकाळ चिकाटीने कामे कराल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
 • तूळ:-घरगुती कामात अधिक कष्ट पडू शकतात. आपल्या गृहसौख्याकडे अधिक लक्ष द्यावे. हातातील कामात यश येईल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. प्रवासात वाहन जपून चालवावे.
 • वृश्चिक:-काही गोष्टींचा अधिक खोलवर विचार करावा. धैर्याने कामे हाती घ्याल. व्यवसायात चांगली आर्थिक कमाई होईल. हातात काही नवीन अधिकार येतील. कौटुंबिक खर्चाचा ताण राहील.
 • धनू:-काही बदल जाणीवपूर्वक करावेत. नसत्या वादात अडकू नका. निराशेच्या आहारी जाऊ नये. घराची कामे सुरळीत पार पडतील. स्वबळावर कामे उरकाल.
 • मकर:-जुन्या गोष्टींचा आधार घेणे टाळावे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कामातील अडथळे प्रयत्नाने दूर करावे लागतील. छुप्या शत्रूंची डोकेदुखी वाढेल. हातातील अधिकार वापरावेत.
 • कुंभ:-उगाचच कोणाशीही वैर पत्करू नका. काही कारणाने घरापासून दिवसभर दूर राहावे लागेल. गप्पांची मैफल जमवाल. तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.
 • मीन:-कामाचा योग्य आढावा घ्यावा. मानसिक ताण जाणवेल. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. मानापमान फार मनावर घेऊ नका. आपले स्वत्व गुण राखून वागाल.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

No comments

Powered by Blogger.