टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर

टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून टोकियो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलण्यात आलं आहे. संघटनेने ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर केल्या असून स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत होणार आहे.
गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ऑलिम्पिक खेळ पुढे ढकलण्याची घोषणा केली. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी ऑलिम्पिक समितीला ऑलिम्पिक खेळ पुढे ढकलण्याची शिफारस केली. पंतप्रधानांची शिफारस मान्य करीत ऑलिम्पिक समितीने या वर्षी होणारी स्पर्धा रद्द केली. यंदा टोकियोत 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत स्पर्धा रंगणार होत्या।

स्पर्धा पुढे ढकलताना समितीने हे स्पष्ट केले की, पुढच्या वर्षीच्या स्पर्धेचे नावही टोकियो ऑलिम्पिक 2020 असणार आहे. रद्द करण्यात आलेल्या स्पर्धेचा ऑलिम्पिक 2024 वर कोणताही परिणाम होणार नाही. ऑलिम्पिक चार वर्षांतून एकदा घेण्यात येते. जर 2021 हे नाव दिले असते तर पुढील ऑलिम्पिकचे आयोजन 2025 साली करावे लागले असते. म्हणून स्पर्धा जरी 2021 साली घेण्यात येणार असल्या तरी नाव हे ऑलिम्पिक 2020 असणार आहे.

जपान सरकार, टोकियोचं स्थानिक प्रशासन आणि सर्वांच्या सहकार्याने आपण या संकटाचा सामना करु असा मला विश्वास आहे, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस ब्लाख यांनी आभार मानले.

कॅनडा आणि अमेरिकेच्या निर्णयानंतर न्यूझीलंड, जर्मनी, इंग्लंडदेखील ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी ऑलिम्पिक समितीवर दबाव आणत होते. सर्व देशांचं म्हणणं होतं की, ऑलिम्पिकदरम्यान, खेळाडूंना कोरोनाचा धोका अधिक आहे. त्यामुळे यासर्व देशांनी ऑलिम्पिक खेळांना एक वर्षांसाठी स्थगित करण्याची मागणी केली होती.

भारतीय अॅथलिट्स ऑलिम्पिक खेळ पुढे ढकलण्याची मागणी करत होते. भारताचा पहिल्या क्रमांचा रेसलर बजरंग पुनियाने यासंदर्भात बोलताना सांगितले होते की, 'जर जिवंत राहिलो तर कधीना कधी ऑलिम्पिक खेळण्याची संधी नक्कीच मिळेल. यावरून स्पष्ट होत होतं की, खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याच्या विरोधात होते. याव्यतिरिक्त प्रॅक्टिस सेशन रद्द झाल्यामुळे खेळाडूंना प्रॅक्टिस करणंही अशक्यचं होतं.

No comments

Powered by Blogger.