कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीला करोनाची लागण

Image result for canada-prime-ministe
कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीला करोनाची लागण

कॅनडाचे 
पंतप्रधान जस्टिन ट्रूडो याच्या पत्नी सोफी यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत कॅनडाच्या प्रमारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान ट्रूडो यांची पत्नीला करोनाची लागण झाली की नाही याबाबच चाचणी घेण्यात आली होती. तपासणीअंती त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ब्रिटनहून परतल्या होत्या सोफी
गुरुवारी सोफी ट्रूडो या फ्ल्यूची लक्षणे दिसल्यानंतर त्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने दिली आहे. सोफी या गुरुवारी ब्रिटनहून परतल्यानंतर त्यांना फ्लूसारखी लक्षणे दिसत होती असे वृत्त या वृत्तसंस्थेने दिले होते. आपल्याला ताप येत असल्याची तक्रार सोफी यांनी आपल्या डॉक्टरांकडे केली. त्यानंतर त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना करोना विषाणूची लागण झाली किंवा कसे याबाबत तपासणी करण्याचा सल्ला दिला होता.

पत्नी सोफी यांना करोनाची लक्षणे आढळल्यानंतर पंतप्रधान जस्टिन ट्रूडो अलग राहत होते. आता तर जस्टिन ट्रूडो आपल्या सर्व मिटिंग्ज घरातूनच करत आहेत.

जस्टिन ट्रूडोंना करोनाचे कोणतेही लक्षण नाही, पीएमओचे निवेदन
जस्टिन ट्रूडो यांच्या कार्यालयातर्फे प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान ट्रूडो यांना कोणतीही लक्षणे आढललेली नाहीत. पंतप्रधान ट्रूडो हे आपले कामकाज सुरू ठेवणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. ते शुक्रवारी देशवासीयांना संबोधित करणार आहेत. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या देखरेखीखाली ते १४ दिवस अलग राहणार आहेत. त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून न आल्याने त्यांची तपासणीही करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.