पाच वर्षांमध्ये पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर ४४६ कोटींचा खर्च
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच वर्षांमध्ये
४४६.५२ कोटी रूपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधानांच्या
परदेश दौऱ्यावर झालेल्या खर्चाविषयी लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावर लेखी उत्तराद्वारे परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच वर्षांमध्ये
किती खर्च करण्यात आला याबाबत सरकारला सवाल करण्यात आला होता. यावर
परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधर यांनी लेखी उत्तराद्वारे माहिती दिली.
पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांमध्ये झालेल्या खर्चांमध्ये चार्टर्ड
विमानांचा खर्चही सामिल असल्याचं यात सांगण्यात आलं. २०१५-१६ या कालावधीत
त्यांच्या परदेश दौऱ्यांवर सर्वाधिक खर्च झाला आगे. या कालावधीत त्यांच्या
दौऱ्यांवर १२१.८५ कोटी रूपयांचा खर्च झाल्याची माहिती त्यांनी उत्तराद्वारे
दिली आहे.
तर २०१६-१७ या कालावधीत पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर ७८.५२ कोटी
रूपये खर्च करण्यात आले. २०१७-१८ मध्ये त्यांच्या परदेश दौऱ्यावर ९९.९०
कोटी रूपये तर २०१८-१९ मध्ये १००.०२ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला.
२०१९-२० या कालावधीत त्यांच्या दौऱ्यावर ४६.२३ कोटी रूपये खर्च करण्यात
आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ
घेतल्यानंतप पहिल्यांदा मालदीव आणि श्रीलंकेचा दौरा केला होता. तर त्यानंतर
त्यांचा अमेरिकेचा दौरा चर्चेचा विषय ठरला होता. त्यांनी ह्युस्टनमध्ये
हाऊडी मोदी या कार्यक्रमाला संबोधित केलं होतं.
Post a Comment