पिंपरी चिंचवड;चालत्या टेम्पोमध्ये महिलेवर केला बलात्कार
राज्यात महिला अत्याचारांचा मुद्दा चर्चेत असताना पिंपरी चिंचवडमध्ये
एका घटनेनं खळबळ उडाली आहे. एका २९ वर्षीय महिलेवर चालत्या आयशर
टेम्पोमध्ये बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. टेम्पोचालक आणि
क्लिनरनं हा प्रकार केला. याप्रकरणी आळंदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
एका महिलेला टेम्पो चालकानं पेरणे फाटा येथे घेऊन जातो, असं सांगून
बसवून घेतलं. त्यानंतर चालक टेम्पो पिंपरी चिंचवडच्या दिशेने घेऊन गेला.
त्यानंतर चालक आणि क्लिनरनं महिलेवर बलात्कार केला. १० मार्चची रात्र ते ११
मार्चच्या पहाटेदरम्यान ही घटना घडली. बलात्कार केल्यानंतर दोघांनी पीडित
महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचबरोबर हा प्रकार कुणाला सांगितल्यास
जिवे मारण्याचीही धमकी दिली. महिलेला पिंपरी चिंचवडला सोडून आरोपी पसार
झाले. यानंतर महिलेनं आळंदी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला आणि तक्रार
दाखल केली. तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पिंपरी चिंचवडमधील महिला अत्याचारांविषयीची आकडेवारी काही महिन्यापूर्वी
समोर आली होती. डिसेंबर २०१९ मध्ये आलेल्या आकडेवारीत पिंपरी-चिंचवड शहरात
महिन्याला सरासरी १२ महिलांवर बलात्कार होत आहे. तर, ३४ महिलांना
विनयभंगासारख्या प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. ११ महिन्यांत तब्बल १३४
महिलांवर बलात्कार झाला आहे; तर ३७७ महिलांचा विनयभंग करण्यात आला आहे.
बलात्काराच्या १३४ गुन्ह्यांपैकी १३२ गुन्ह्यांतील आरोपींना पकडण्यात
पोलिसांना यश आले आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पिंपरी चिंचवडमधील महिला
सुरक्षेचा प्रश्न सातत्यानं ऐरणीवर येत आहे.
Post a Comment