आजचे राशीभविष्य

मेष : बाता मारणाऱ्यांपासून सावध राहा. वास्तवाला धरूनच निर्णय हवे. कल्पनाविश्वात रमू नका.
वृषभ : आपमतलबी लोकांना दूर ठेवा. विचारचक्रे सुरू राहतील. आर्थिक तोटा सहन करावा लागेल.

मिथुन : कौटुंबिक निर्णय घ्याल. नातेसंबंधांत स्नेह निर्माण होईल. आनंदाचा दिवस. 

कर्क : विश्रांतीनंतर आळस येईल. वादग्रस्तता टाळा. महत्त्वाच्या निर्णयांविषयी गुप्तता राखाल.
सिंह : एकटेपणा जाणवेल. निराशा टाळावी. गृहीत धरणे टाळायला हवे.

कन्या : शारीरिक ताण टाळा. औषधांवर खर्च होईल. सुसंवाद घडावा.

तुळ : अति चर्चा ताण वाढवेल. वाद वाढेल. शांततेचा मार्ग अवलंबावा.

वृश्चिक : आशा आकांक्षांना मुरड घालावी लागेल. प्रकृतीत अनुकूल सुधारणा होईल. आजचा दिवस संमिश्र.

धनु : आकस्मिक बदलांमुळे गोंधळून जाल. धोरण ठरवावे लागेल. संध्याकाळ आनंदात जाईल.

मकर : विरोध मोडून काढू शकाल. एकांगी विचार नको. दडपणाखाली वावरू नका.

कुंभ : जोडीदाराकडे लक्ष द्यायला हवे. भावनिक निर्णय घेऊ नका. घरात लक्ष हवेच.

मीन : आध्यात्मिक आनंदाची अनुभूती राहील. सहज प्रवृत्तीवर काम कराल. कोडी सुटतील.

No comments

Powered by Blogger.