एअर इंडियाची तिकिट विक्री 30 एप्रिल पर्यंत बंद
![]() |
एअर इंडियाची तिकिट विक्री 30 एप्रिल पर्यंत बंद |
सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने 30 एप्रिलपर्यंत तिकिट बुकिंग बंद केली असून त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद असणार आहे. एअर इंडियाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर पुढे काय निर्णय घेण्यात येईल याकडे आमचं लक्ष आहे.'
14 एप्रिलला लॉकडाऊन संपल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले. 14 एप्रिल पर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमान वाहतूक रद्द करण्यात आली आहे. मात्र असे असताना एअर इंडिया ने 30 एप्रिल पर्यंत आरक्षण प्रक्रिया रद्द केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे, एअर इंडियाच्या वेैमानिकांच्या संघटनेने त्यांच्या भत्त्यामधील 10 टक्के कपातीला विरोध दर्शवला आहे.
Post a Comment