'वॉर अगेन्स्ट व्हायरस' संकल्पनेसाठी भूपाल रामनाथकर यांचा पुढाकार

'वॉर अगेन्स्ट व्हायरस' संकल्पनेसाठी भूपाल रामनाथकर यांचा पुढाकार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी कोरोना व्हायरस आपल्या राज्यातून घालवणारच आणि महाराष्ट्रातील जनतेला या संकटातून वाचवणारच असा जणू पणच केला आहे. यासाठी त्यांनी थेट सैन्यातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि वैद्यकीय क्षेत्रातील निवृत्त सिस्टर्स ब्रदर्स नाही. या युद्धात मदत करायला पुढे येण्याची विनंती केली असून कोविड योद्धा म्हणून आपली नोंदणी ही करायला सांगितली आहे. कोरोना विरोधातील युद्धात आता कला क्षेत्रातील मंडळीही उतरली आहे. याच पार्श्वभूमीवर जे.जे स्कुल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी आणि उद्धव ठाकरे यांचे वर्गमित्र भूपाल रामनाथकर यांनी पुढाकार घेतलाय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मदतीला जाहिरात क्षेत्रातील आणि डिझाइन क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ आणि जे.जे चे विद्यार्थीही आपल्या कलेने सहभाग नोंदवत आहेत. त्यातलेच एक मुख्य नाव म्हणजे भूपाल रामनाथकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जे जे स्कुल ऑफ आर्ट मधील वर्ग मित्र राहिलेले रामनाथकर सगळ्या डिझाइन ना वेगळा टच देत आहेत. नवीन कल्पनांना आकार देऊन अत्यंत प्रभावीपणे लोकाना घरी राहण्याबाबत आग्रह करणारी डिझाइन तयार करुन प्रसिद्ध करत आहेत. त्यांची आकर्षक डिझाइन लोकांच्या मनाचा ठाव घेत आहेत आणि घराचा उंबरठा न ओलांडण्याबाबत जनतेची भूमिका पक्की करत आहेत.
जनजागृतीच मोठी गरज
कोरोना विषाणूने आता राज्यात हातपाय पसरायला सुरुवात केलीय. अवघ्या आठवड्यात कोरोना संक्रमितांचा आकडा हजारच्या वर गेलाय. राज्यातली आरोग्य यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. नागरिकांनी सरकारच्या सूचनांचे पालन करण्याचीही प्रशासनाकडून वारंवार विनंती केली जात आहे. मात्र, तरीही लोक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहे. परिणामी राज्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे अशा कलाकारांनी पुढाकार घेऊन जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.

No comments

Powered by Blogger.